
पद्मनाभदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती
पद्मनाभदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती
दाभोळः दापोलीतील सह्याद्री प्रतिष्ठानकडून दापोली ऐतिहासिक वारसा असलेल्या पन्हाळेकाजी लेणी येथील प्रणालकदुर्ग उर्फ पद्मनाभदुर्ग या किल्ल्यावर स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली. या किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था गेल्या वर्षभरापासून दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहे. पायवाट, तटबंदी आणि टाके स्वच्छतेची कामे करण्यात आली असून येत्या काळात ग्रामस्थांच्या सहकार्याने इतिहास व दुर्गसंवर्धन जागर करण्यात येणार आहे, असे दापोली विभाग संपर्कप्रमुख ललितेश दवटे यांनी सांगितले. संस्थेचे ओंकार मोरे, राहुल खांबे आणि अजिंक्य कोळंबेकर यांनी दुर्गसंवर्धन कार्यात शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आव्हान केले. या उत्सवात दीपोत्सव, दुर्ग इतिहास आणि संवर्धन यावर विशेष चर्चासत्र, स्थानिक ग्रामस्थांचा सत्कार व मनोगत झाले तसेच श्रीवर्धन, मंडणगड, खेड आणि मुंबई या विभागांचे दुर्गसेवक उपस्थित होते.