
चिपळूण-अध्यक्षपदी सतीश खेडेकर
rat२४३९.txt
बातमी क्र..३९ (पान २ साठी)
चिपळूण अर्बनच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट
अध्यक्षपदी सतीश खेडेकर
चिपळूण, ता. २४ ः चिपळूण अर्बन बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची पहिली सभा गुरुवारी (ता. २३) झाली. सभेत बोर्ड ऑफ मॅनेजमेंट (व्यवस्थापन मंडळ) अध्यक्षपदी बँकेचे माजी चेअरमन सतीश खेडेकर यांची बिनविरोधी निवड करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेने सर्व सरकारी बँकांना बँकेच्या संचालक मंडळास त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची शिफारस व मार्गदर्शन घेऊन बँकिंग कामकाज करण्यासाठी बोर्ड ऑफ मॅनेजमेंट नियुक्ती करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार यापूर्वी बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची स्थापना झाली होती. बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यामुळे संचालक मंडळाची बिनविरोध निवडणूक होऊन नवनिर्वाचित संचालक मंडळाची स्थापना झाली आहे. पूर्वीच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमधील सदस्यांचा कालावधीदेखील संपुष्टात आला. बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्याची गरज असल्याने बँकेच्या संचालक मंडळातील सदस्य, पॅनेलप्रमुख सुचय रेडीज, उमेश काटकर व संजय रेडीज यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्यांची नियुक्ती झाली. त्यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्यात आली. विद्यमान संचालक मंडळातील संचालक संजय रेडीज (स्मॉल स्केल इंडस्ट्रीज), ॲड. दिलीप दळी (कायदेतज्ज्ञ), सीए विवेक रेळेकर (अर्थक्षेत्र) यांची निवड करण्यात आली. इतर क्षेत्रामधून सतीश खेडेकर (सहकार क्षेत्र), विराज ओक (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्र), विराज दळी (कृषिक्षेत्र) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई हे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे पदसिद्ध सदस्य असणार आहेत. बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची पहिली सभा गुरुवारी (ता. २३) झाली. त्यामध्ये बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्षपदी सतीश खेडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.