मडुरा, रोणापाल, इन्सुली
मंदिरात चोरीचा प्रयत्न

मडुरा, रोणापाल, इन्सुली मंदिरात चोरीचा प्रयत्न

85075
इन्सुली ः येथील मंदिरात चोरी करणारे अज्ञात युवक सीसीटीव्हीत कैद झाले.

मडुरा, रोणापाल, इन्सुली
मंदिरात चोरीचा प्रयत्न

परिसरात खळबळ; चोरटे सीसीटीव्हीत कैद

बांदा, ता. २४ ः मडुरा, रोणापाल व इन्सुली येथील ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात बुधवारी (ता.१५) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. इन्सुली व रोणापाल मंदिरात चोरी करताना दोघे युवक चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. तिन्ही ठिकाणी चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. बांदा पोलिसांत चोरीबाबत फिर्याद नसल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शामराव काळे यांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम चोरट्यांनी मडुरा माऊली मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून फंडपेटी फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र, त्यात फारशी रोकड नव्हती. त्यानंतर रोणापाल माऊली मंदिरात चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला. रोणापाल मंदिरात फंडपेटीच नसल्याने चोरट्यांना याठिकाणी काहीच गवसले नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास इन्सुली माऊली मंदिर फोडले. त्यात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. हा प्रकारही सीसीटीव्हीत कैद झाला. फुटेजमध्ये अंदाजे २० ते २५ वयोगटातील दोघे तरुण दिसत आहेत. बांदा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे. बांदा पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आहे. चोरीच्या तीन्ही घटनांमध्ये रोकड किंवा मौल्यवान वस्तू चोरीस न गेल्याने पोलिस स्टेशनमध्ये संबंधितांकडून रीतसर तक्रार देण्यात आलेली नाही. रोणापाल व इन्सुली मंदिरातील फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. चोरट्यांनी मास्क वापरल्याने चेहरा स्पष्ट दिसत नाही. अन्य पर्याय तपासण्याचे काम सुरु असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. काळे यांनी सांगितले. या घटनांनी परिसरात खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com