ठाकरे सेनेचे पक्षबांधणीसाठी जिल्ह्यात 3 मेळावे

ठाकरे सेनेचे पक्षबांधणीसाठी जिल्ह्यात 3 मेळावे

rat२४३७.txt

बातमी क्र.. ३७ (पान ३ साठी)

ठाकरे सेनेचे पक्षबांधणीसाठी जिल्ह्यात तीन मेळावे

कार्यकारिणीचा निर्णय ; सुभाष देसाईंसह पदाधिकारी येणार

रत्नागिरी, ता. २४ ः राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचा शिवसेनेवर मोठा परिणाम झाला. पक्षात उभी फूट पडल्यानंतर जिल्ह्यातही मोठी पडझड झाली. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे सेनेने पक्ष बांधणीला सुरवात केली आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी जिल्हा कार्यकारिणीची बैठक रत्नागिरीत झाली. त्यामध्ये शिवगर्जना अभियानाअंतर्गत जिल्ह्यात तीन ठिकाणी मेळावे घेऊन पक्षामध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्याचा ठाकरे सेनेचा प्रयत्न आहे. यामध्ये रत्नागिरी, लांजा-राजापूर, संगमेश्वर तालुक्यातील तीन मेळावे घेतले जाणार आहेत. या मेळाव्याला शिवसेना नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेनेत उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदे ४० आमदार घेऊन बाजूला झाले. त्यामुळे अल्पमतात आलेल्या महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले. त्यानंतर शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी राज्यभर दौरे करून सेनेमध्ये पुन्हा ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याला चांगला प्रतिसादही मिळला. या शिवगर्जना अभियानामुळे ठाकरे सेनेतील गळती काहीशी कमी झाली. रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी शिंदे गटात गेले. अल्पावधीत शिंदे गटाला जिल्ह्यात ताकद मिळू लागली. अनेक नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात गेले. त्यात उद्योगमंत्री आणि पालकमंत्रीपद शिंदे गटाकडे असल्याने विकासकामाच्या माध्यमातून शिंदे गटाने आपले हातपाय पसरलायला सुरवात केली.
त्यात ठाकरे सेनेला आणखी एक धक्का बसला आणि निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबान हे चिन्ह शिंदे गटाला दिल्याने सेना पुरती खचली. या सर्व राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ठाकरे सेनेने पुन्हा मोट बांधायला सुरवात केली आहे. शिवगर्जना अभियानांतर्गत जिल्ह्यात तीन ठिकाणी मेळावे घेण्यात येणार आहेत. त्याच्या नियोजनासाठी आज जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. त्यासाठी ठाकरे सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी, लांजा आणि संगमेश्वर या ३ ठिकाणी पक्षबांधणीसाठी मेळावे घेण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com