रत्नागिरी-सहाय्यक कर्मचाऱ्यांचे मूक अर्धनग्न आंदोलन

रत्नागिरी-सहाय्यक कर्मचाऱ्यांचे मूक अर्धनग्न आंदोलन

rat२४p२३.jpg
८५०१४
रत्नागिरीः सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या आवारात मूक अर्धनग्न आंदोलन केले.
--------------
अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन
सार्वजनिक बांधकाम कार्यालयातील ४९ जणांचा समावेश; चुकीच्या धोरणाचा निषेध
रत्नागिरी, ता. २४ः विविध प्रलंबित मागण्यांसह प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध सर्व वयोवृद्ध सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २४) मूक अर्धनग्न आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम मंडल कार्यालय आवारात सर्व महाराष्ट्र स्तरावर एकाच दिवशी हे आंदोलन सकाळी १० ते ४ पर्यंत करण्यात आले. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४९ निवृत्त कर्मचारी सामील झाले.
सार्वजनिक बांधकाम विभाग स्तरावर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक १४ संवर्गीय कर्मचाऱ्यांचे पूर्वनियोजित २४ फेब्रुवारी २०१३ ला संपूर्ण महाराष्ट्र स्तरावर झाले. राष्ट्रीय महामार्ग परिमंडळ कार्यालयात एकूण ७ सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागांतर्गत सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कृती समितीने शासनाला वेळोवेळी निवेदन दिले. राज्यपाल यांनाही १४ नोव्हेंबर २०२२ ला निवेदन दिले. तरीही त्याची दखल घेण्यात आली नाही. प्रशासनाच्या या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ वयोवृद्ध स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कर्मचारी आज राज्यभरात एकाचवेळी सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयाच्या आवारात मूक अर्धनग्न आंदोलनात करून सामूहिक निषेध करण्यात आला.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम १५ नुसार, सर्व १४ संवर्ग कर्मचाऱ्यांचे पदनामांतर करून समकक्ष स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर १ जानेवारी १९८९ समाविष्ट करणे व नियम ४० नुसार वेतन निश्चिती करणे, १ ऑक्टोबर १९८९ कालबद्ध पदोन्नतीअंतर्गत पहिला लाभ पदोन्नती साखळीतील वरिष्ठ पदाच्या वेतन श्रेणीचा लाभ द्यावा, आश्वासित प्रगती योजनेंतर्गत वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ करावा, काल्पनिक वेतनवाढीचा फरक रोखीने द्यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com