Tue, March 28, 2023

विजेचा खांब पडून प्रौढ गंभीर
विजेचा खांब पडून प्रौढ गंभीर
Published on : 24 February 2023, 2:11 am
विजेचा खांब पडून प्रौढ गंभीर
रत्नागिरीः शहरानजीकच्या मिरजोळे-एमआयडीसी येथे ट्रकच्या धडकेमुळे विजेचा पोल अंगावर पडल्याने प्रौढ गंभीर जखमी झाला. गणेश विष्णू खातू (वय ४०, रा. वांद्री ता. संगमेश्वर) असे जखमी प्रौढाचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसात केली आहे. पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश खातू हे शुक्रवारी (ता. २४) सकाळी मित्राच्या दुचाकीवर मागे बसून जे. के. फाईल्स ते ओमेगा कंपनी असे जात होते. सकाळी दहाच्या सुमारास जिलानी कंपनी समोरील रस्त्यावर रिव्हर्स घेत होता. डंपरची विजेच्या पोलला धडक बसली. यामुळे वीजेचा पोल हा दुचाकीवरुन जात असलेल्या गणेश यांच्या डोक्यावर पडला. या घटनेत गणेश यांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली.