ओव्हरलोड वाळू वाहतूकप्रकरणी दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओव्हरलोड वाळू वाहतूकप्रकरणी दंड
ओव्हरलोड वाळू वाहतूकप्रकरणी दंड

ओव्हरलोड वाळू वाहतूकप्रकरणी दंड

sakal_logo
By

85110
वैभववाडी ः कारवाई केलेले ट्रक.

ओव्हरलोड वाळू वाहतूकप्रकरणी दंड

वैभववाडीत तीन ट्रक चालकांवर कारवाई

वैभववाडी, ता. २४ ः क्षमतेपेक्षा अधिक वाहतुक करणाऱ्या तीन ट्रकवर १ लाख ५६ हजार ३५ दंड केला आहे. ही कारवाई काल (ता.२४) रात्री वैभववाडी तहसीलदार प्रसनजीत चव्हाण यांच्या पथकाने शहरात केली.
तळेरेहून कोल्हापूरकडे वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रकची तहसिलदार चव्हाण, नायब तहसिलदार संकेत यमगर, तलाठी बागल यांनी तपासणी केली असता गौरव गंगाधर पाटील (रा.गगनबावडा, ट्रक क्रमांक एमएच-०९,सीयु ९२४८), राजाराम विठ्ठल गुरव (रा.साळवण, ता.गगनबावडा, ट्रक क्रमांक केए-२२ सी- ९४४३), शिवाजी मारूती माने (रा.कळे, ट्रक क्रमांक एमएच-०९,सीए-८३७५) या तीन ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळु आढळून आली. तीन ट्रकवर १ लाख ५६ हजार ३५ रूपये दंड आकारण्यात आला आहे.