सोनवडेत विविध उपक्रमांना प्रतिसाद

सोनवडेत विविध उपक्रमांना प्रतिसाद

85201
सोनवडे ः किल्ले सोनगड येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.

सोनवडेत विविध उपक्रमांना प्रतिसाद

‘एलसीएम’चा पुढाकार; रक्तदान शिबिरांसह शालेय साहित्य वाटप

कुडाळ, ता. २५ ः एलसीएम युवा प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्यावतीने शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरासह मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप आदी विविध उपक्रम राबविण्यात आले.
एलसीएम युवा प्रतिष्ठान आणि एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सोनवडे शाळा नं. १ येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराचा सोनवडे पंचकोशीतील १२२ जणांनी लाभ घेतला.साळेल व कट्टा केंद्रप्रमुख श्रीकृष्ण सावंत यांच्या हस्ते शिबिराचे उद्‍घाटन झाले. यावेळी पदवीवर शिक्षक संतोष कुडाळकर, लेखापरीक्षक राकेश धर्णे, बाबू गावकर, मुख्याध्यापक सावंत, सरपंच प्रतीक्षा घाडी, संतोष घाडीगावकर, एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पिटलचे डॉ. अमोल चव्हाण, डॉ. आकाश जाधव, डॉ. जोशी प्रतिष्ठानचे पदाधिकारी हेमंत चव्हाण, गीतेश परब, दिनेश गुरव, रुपेश तेलंग, प्रथम गुरव, प्रदीप चव्हाण, संकेत परब, वसंत गुरव, अक्षय गुरव, कल्पेश चव्हाण, करण चव्हाण, कुलदीपक पाताडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडेचे प्राचार्य एस. एस. सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी सुस्मिता गावकर, स्वप्नाली घाडीगावकर, सत्यवान घाडीगावकर आदींसह शिक्षक तसेच सुरेश परब, गणेश परब, नारायण गावडे आदी उपस्थित होते. शिबिरात २९ जणांनी रक्तदान केले. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले सोनगड येथे जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी आंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत चव्हाण, मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सोनवडे नं.१ शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com