पर्यटन, उद्योग विस्तारासाठी प्रयत्न 
पर्यटन, उद्योग विस्तारासाठी प्रयत्न

पर्यटन, उद्योग विस्तारासाठी प्रयत्न पर्यटन, उद्योग विस्तारासाठी प्रयत्न

85202
कुडाळ ः सिंधुदुर्ग व्यापारी पर्यटन समितीच्या बैठकीत बोलताना मान्यवर व पदाधिकारी.


पर्यटन, उद्योग विस्तारासाठी प्रयत्न

कुडाळमध्ये निर्धार; सिंधुदुर्ग व्यापारी पर्यटन समितीची बैठक

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ ः सिंधुदुर्ग व्यापारी पर्यटन समितीच्या बैठकीत ध्येयधोरणे व घटना ठरविण्यात आली. प्रामुख्याने सिंधुसागरापासून सह्याद्रीपर्यंत पर्यटन उद्योग विस्तारण्यासाठी काम करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला, अशी माहिती समिती अध्यक्ष राजन नाईक यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ संचलित सिंधुदुर्ग व्यापारी पर्यटन समितीची पहिली बैठक नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथील मराठा हॉलमध्ये नुकतीच पार पडली. या बैठकीला व्यापारी महासंघ व पर्यटन समितीच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. बैठकीमध्ये पर्यटन समितीची ध्येयधोरणे व घटना ठरविण्यात आली. ज्यामध्ये प्रामुख्याने सिंधुसागरापासून सह्याद्रीपर्यंत पर्यटन उद्योग विस्तारण्यासाठी व्यापारी पर्यटन समिती काम करणार आहे. समितीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरीच वर्षे रखडलेला सी-वर्ड हा प्रकल्प लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने शासन दरबारी विशेष प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे ''अँग्रिया बँक'' हे समुद्रामध्ये असलेले आयलँड पर्यटकांसाठी खुले होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र शासनाने पर्यटन उद्योगाच्या वाढीसाठी सर्व्हिस इंडस्ट्रीजला औद्योगिक दर्जा देण्याचे यापूर्वीच जीआर काढून जाहीर केले आहे; परंतु हॉटेल्स रिसॉर्ट मोटेल्ससह सर्व्हिस इंडस्ट्रीजमध्ये मोडणाऱ्या सर्व उद्योगांना औद्योगिक दर्जा मिळूनही विजेचे दर हे कमर्शियल दरानेच लावले जात असून ते औद्योगिक दराने लावले जावेत, यासाठी समिती शासन दरबारी विशेष प्रयत्न करणार आहे.
या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, सेक्रेटरी नितीन वाळके, पर्यटन समितीचे अध्यक्ष राजन नाईक, टोलमुक्ती संघटनेचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संतोष काकडे, व्यापारी पर्यटन समितीचे सचिव विलास कोरगावकर, नंदन वेंगुर्लेकर, गजानन कांदळगावकर, प्रथमेश सामंत, मनोज वालावलकर, जितेंद्र पंडित, विवेक नेवाळकर, प्रमोद नलावडे, अभी वेंगुर्लेकर, मोहनीश कुडाळकर, दिग्विजय कोळंबकर, संदेश गोसावी, कुडाळ तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट आदी उपस्थित होते.
--
सह्याद्रीच्या कुशीतील भागाकडे लक्ष
जिल्ह्यातील पूर्वेकडील म्हणजेच सह्याद्रीच्या कुशीत वसलेला भाग सृष्टीसौंदर्याने नटलेला असूनही तो पर्यटनापासून वंचित आहे. हा सर्व परिसर सिंधुदुर्गवासीयांबरोबरच पर्यटकांच्या नजरेखाली यावा, या हेतूने एप्रिलमध्ये दुचाकी रॅलीचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. या रॅलीमध्ये जिल्ह्यासह महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातील दुचाकीस्वारांच्या मोठ्या सहभागासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे साहसी क्रीडा प्रकार, क्रॉस व्हॅली, रॅपलिंग, विविध दुर्लक्षित राहिलेले धबधबे, पावसाळी पर्यटन या विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com