‘कुडाळेश्वर’च्या प्राचीन वास्तुरचनेचा अभ्यास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कुडाळेश्वर’च्या प्राचीन वास्तुरचनेचा अभ्यास
‘कुडाळेश्वर’च्या प्राचीन वास्तुरचनेचा अभ्यास

‘कुडाळेश्वर’च्या प्राचीन वास्तुरचनेचा अभ्यास

sakal_logo
By

85203
कुडाळ ः श्री देव कुडाळेश्वर मंदिराच्या प्राचीन वास्तुकलेची पाहणी करताना मुंबई येथील कॉलेजचे विद्यार्थी. (छायाचित्र ः अजय सावंत)


‘कुडाळेश्वर’च्या प्राचीन वास्तुरचनेचा अभ्यास

मुंबईतील विद्यार्थ्यांचा अभ्यासदौरा; पर्यटनाला चालना मिळण्यासाठी फायदा

कुडाळ, ता. २५ ः कोकणातील विशेष करून सिंधुदुर्गातील प्राचीन मंदिरांपैकी एक असलेले येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिराच्या वास्तुकलेचा व वास्तुरचनेचा अभ्यास मुंबई येथील एल. एस. रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्टचे ८६ विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. येथील प्राचीन मंदिरांची, वास्तुशास्त्राची आणि सांस्कृतिक वारशाची राष्ट्रीयस्तरावर नोंदणी व्हावी, या सर्वांचा अभ्यास व्हावा आणि याचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे, हा या अभ्यास दौऱ्याचा उद्देश असल्याची माहिती महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्राध्यापक अरविंद खानोलकर यांनी दिली.
कोकणात प्राचीन मंदिरे मोठ्या प्रमाणात आहेत. या मंदिरांचा अभ्यास करण्यासाठी २००८ पासून एल. एस. रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्टमार्फत प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सिंधुदुर्गात आणत आहेत. यापूर्वी जिल्ह्यातील वेंगुर्ले, खानोली, आकेरी, नेमळे, वालावल, नेरुर, मुणगे येथील मंदिरांच्या ठिकाणी अभ्यास दौरा करण्यात आला होता. यावर्षी श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे हा अभ्यास दौरा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. माजी प्राचार्य खानोलकर, प्रा. सचिन प्रभू, प्रा. मिलिंद दामले, प्रा. नीता सरोदे, प्रा. दीपा देसाई, प्रा. श्रद्धा पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम वर्षाचे ८६ विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा यात सहभाग आहे.
--
...म्हणून कुडाळेश्वर मंदिराचा अभ्यास
खानोलकर म्हणाले की, कोकणातील प्राचीन मंदिरांची बांधकाम शैली ग्रामीण वास्तुशैली आहे. या सांस्कृतिक वारशाचा, बांधकाम शास्त्राचा राष्ट्रीयस्तरावर अभ्यास करता यावा, त्याची नोंदणी व्हावी, पर्यटनाला चालना मिळावी आणि पुढच्या पिढीला नवीन बांधकाम शास्त्रात त्याचा वापर करता यावा, हा उद्देश आहे. कुडाळेश्वर मंदिर हे प्राचीन वास्तुशैलीचा उत्तम नमुना असल्याने या मंदिराची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली. दौऱ्यादरम्यान श्री देव कुडाळेश्वर मित्रमंडळाचे चांगले सहकार्य लाभले.