मराठी अध्यापक संघाचे उद्या पुरस्कार वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी अध्यापक संघाचे 
उद्या पुरस्कार वितरण
मराठी अध्यापक संघाचे उद्या पुरस्कार वितरण

मराठी अध्यापक संघाचे उद्या पुरस्कार वितरण

sakal_logo
By

मराठी अध्यापक संघाचे
उद्या पुरस्कार वितरण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ व दीपक केसरकर मित्रमंडळ, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. २७) मराठी भाषा गौरव दिनानिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भाषादिनानिमित्त आदर्श मराठी अध्यापक पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. यावेळी अध्यापक मराठी भाषा विकासासाठी विविध उपक्रम राबविलेल्या अध्यापकांचा सत्कार स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे. निवृत्त मराठी अध्यापकांचा स्नेहमेळावा व मार्च २०२२ च्या शालांत परीक्षेत ज्या मुलांना मराठी विषयात २७० पेक्षा जास्त गुण मिळाले, त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. पानवळ महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद काजरेकर, महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष वि. ना. लांडगे, माजी मुख्याध्यापक प्रदीप शिंदे उपस्थित राहणार आहेत. निवृत्तीनंतरही मराठी भाषेच्या अभिरुद्धीसाठी शाळा व वाचनालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविणाऱ्या पंचवीस उपक्रमशील साहित्यिक शिक्षकांचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व पुस्तक घेऊन गौरव केला जाणार आहे. हा कार्यक्रम येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये (प्रांत कार्यालयासमोर) सोमवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. जिल्ह्यातील मराठी अध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष भरत गावडे, सचिव दीपक जाधव यांनी केले आहे.