निराधार योजनेचे ११८ प्रस्ताव मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निराधार योजनेचे ११८ प्रस्ताव मंजूर
निराधार योजनेचे ११८ प्रस्ताव मंजूर

निराधार योजनेचे ११८ प्रस्ताव मंजूर

sakal_logo
By

निराधार योजनेचे ११८ प्रस्ताव मंजूर
कणकवली ः संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक तहसीलदार आर. जे. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ११८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मुख्याधिकारी अवधूत तावडे, संजय गांधी योजना नायब तहसीलदार प्रिया परब, अव्वल कारकून आय. एच. पेडणेकर, बी. आर. जाधव, ए. ए. बागवे आदी उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजनेचे ७४, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना गट ''अ''चे ८, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना गट ''ब'' २४, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना ८, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना ३, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजना १ अशा प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
------------
प्रा. किशोर देसाईंना ‘डॉक्टरेट’
सावंतवाडी ः डेगवे येथील प्रा. किशोर साबाजी देसाई यांना मुंबई विद्यापीठातर्फे डॉक्टरेट (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील मराठी नाटकातील नायक, संकल्पना आणि स्वरुप चिकित्सक अभ्यास या विषयावर त्यांना डॉक्टरेट देण्यात आली. सध्या देसाई हे टी. एस. बाफना कनिष्ठ महाविद्यालय, मालाड-पश्चिम, मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांच्या डेगवे गावी माध्यमिक विद्यालय, डेगवे येथे झाले. आपली नोकरी, शिक्षण सांभाळून ते आपल्या इतर छंदात व्यस्त असतात. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, नाट्याभिनय आदींसह गावच्या डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ या संस्थेच्या कामकाजातही त्यांचा सहभाग असतो.