
प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांना ज्ञानमहर्षी पुरस्कार जाहीर
rat२५१४.txt
बातमी क्र..१४ ( पान २ साठी)
फोटो ओळी
-rat२५p१४.jpg -
८५१७२
डॉ. बाळासाहेब लबडे
-
डॉ. बाळासाहेब लबडे यांना ज्ञानमहर्षी पुरस्कार
मराठबोली संस्था ;डॉ. सदानंद मोरे, रमण रणदिवे यांच्या पंक्तीत
रत्नागिरी, ता. २५ ः पुणे येथील मराठबोली संस्थेतर्फे देण्यात येणारा ज्ञानमहर्षी पुरस्कार गुहागर येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या एकूण साहित्यसेवेसाठी ज्ञानमहर्षी हा सन्मानाचा पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर उमरदंड यांनी जाहीर केला आहे. संस्थेचा यंदा अठरावा वर्धापन दिवस २६ मार्चला साजरा होणार आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींना विविध पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते पत्रकार भवन, गांजवे चौक, पुणे येथे सन्मानित केले जाणार आहे. यापूर्वी हा पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, गझलकार रमण रणदिवे यांना प्रदान करण्यात आला आहे.
डॉ. लबडे हे दीर्घकाळापासून उत्तम अध्यापन करून शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवत आहेत तसेच समीक्षक, कादंबरीकार, कवी, गझलकार, गीतकार, संशोधक, संपादक, साहित्य चळवळीचे मानकरी, नामवंत वक्ते, अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी, विविध वाहिन्यांवर व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कविता मनामनातली, खारवी बोलीच्या कविता, विडंबन कविता असे कार्यक्रम सादर करणारे, पसायदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. ते गेल्या २३ वर्षांपासून मराठी विभागप्रमुख म्हणून सेवेत आहेत. त्यांनी मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील ''पिपिलिका मुक्तिधाम'' सारख्या कादंबरीचे लेखन, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे यांच्यानंतर मुंबईचे दखलपात्र चित्रण करणारा ''मुंबई बंबई बाँम्बे'' कवितासंग्रह, चित्रे कोलटकर यांच्यानंतर ''महाद्वार'' सारखा मराठी कवितेत मैलाचा दगड ठरलेला कवितासंग्रह, मराठी कादंबरीतील पहिल्या रांगेतील ठरलेली अनोखी ''शेवटची लाओग्राफिया'' ही कादंबरी.
--