
फणसगाव महाविद्यालयात युवा महोत्सव उत्साहात
85186
फणसगाव ः युवा महोत्सवात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. (छायाचित्र ः एन. पावसकर)
फणसगाव महाविद्यालयात
युवा महोत्सव उत्साहात
तळेरे, ता. २५ : फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था, मुंबई संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय, फणसगाव येथे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतील गुणवंत मुलांना गौरविण्यात आले.
संस्थेचे सचिव प्रभाकर नारकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी संस्था सदस्य महेश नारकर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नारकर, बाबू आडिवरेकर, महेश पडवळ आणि फणसगावच्या सरपंच सायली कोकाटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन करून तृतीय वर्षातील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी, क्रीडा विभागाच्या स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळणारे विद्यार्थी, सांस्कृतिक विभागामार्फत घेतल्या गेलेल्या विविध स्पर्धा, एनएसएस आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी, आजीवन विभागचे आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला. दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी सामूहिक व वैयक्तिक नृत्य, गायनासह विविध कलागुण सादर केले. प्राचार्या अनुश्री नारकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जान्हवी नारकर यांनी अहवाल वाचन केले. अध्यक्षीय भाषणात संतोष चव्हाण यांनी संस्थेच्या देदीप्यमान यशाचा मागोवा घेतला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अनुरुद्र नारकर, शशिकांत मांजरेकर, पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. ज्योस्त्ना कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. केतकी पारकर यांनी आभार मानले.