कळसुलकर हायस्कूलचे यश
कळसुलकर हायस्कूलचे  
एनएमएमएस परीक्षेत यश

कळसुलकर हायस्कूलचे यश कळसुलकर हायस्कूलचे एनएमएमएस परीक्षेत यश

85225
पार्थ सावंत, साक्षी कुडतरकर

कळसुलकर हायस्कूलचे यश
सावंतवाडी ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२२-२३ चे आयोजन आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी केले होते. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे, ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड झाल्यास बारावीपर्यंत प्रत्येक महिन्याला १००० रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती मिळते. या परीक्षेत येथील कळसुलकर प्रशालेतील पार्थ सावंत, साक्षी कुडतरकर हे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांनी केंद्राच्या राष्ट्रीय पातळीवर एनएमएमएस परीक्षेत शिष्यवृत्तीधारक पात्रतेचे यश संपादन केले आहे. कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी या प्रशालेच्या वतीने लौकिकात भर टाकणाऱ्या या कामगिरीबद्दल या दोन विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षिका एस. एस. दळवी, पी. एम. शिंदे, लिपिक वर्षा बल्लाळ आदींचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com