गुहागर ः जिवंत शिल्प साकारणारा अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुप

गुहागर ः जिवंत शिल्प साकारणारा अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुप

rat२५p९.jpg, rat२५p१२.jpg, rat२५p१३.jpg
८५१६९, ८५१७०
गुहागरः व्याडेश्वर महोत्सव अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपने साकारलेली मानवी शिल्पं.
-------------
जिवंत शिल्प साकारणारा अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुप
व्याडेश्वर महोत्सवाचे आकर्षण; प्रोत्साहन निधीतून शैक्षणिक मदत
गुहागर, ता. २५ ः तीन दिवसीय व्याडेश्वर महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपने जिवंत शिल्पं साकारली. अनेकजण ही मानवी शिल्पं बारकाईने न्याहाळून मनसोक्त कौतुक करत होते. अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तीन दिवसांत मिळालेल्या प्रोत्साहन निधीतील अर्धी रक्कमेतून शैक्षणिक साहित्य खरेदी करून जीवनज्योती शाळेला दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा (ता. सावंतवाडी) येथील मनोज कल्याणकर यांनी अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपची २० वर्षांपूर्वी स्थापना केली. महाविद्यालयीन शिक्षण घेताना बांदामधील स्टॅच्यू स्पर्धेत सलग तीनवेळा मनोजने प्रथम क्रमांक मिळवला. वेगळं काहीतरी करावं म्हणून मनोज आणि त्यांच्या मित्रांनी शिरोडा महोत्सवात प्रत्येक ग्रुप डान्सनंतर एक अशी वेगवेगळी मानवी शिल्पं साकारली. त्यातूनच पुढे बांदा म्हणजे स्टॅच्यू कलाकारांचे गाव अशी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपची स्थापना केली.
विवेक अंबिये या चित्रकाराने त्यांना शिल्पकलेसाठी निवड, रंगसंगतीबाबत मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे सोनेरी, रूपेरी, ब्राँझ, माती, ग्रे, काळा आणि पांढरा असे सात रंग शिल्पासाठी वापरतात. शरीराला व कपड्यांना तेल लावून त्यावर रंग देतात. प्रकाशात पुतळा आकर्षक दिसण्यासाठी काही वेळा प्राथमिक रंगावर शेडसाठी दुसऱ्या रंगाचा वापर करतात. अलिबागच्या महोत्सवात १२ दिवस दररोज आठ तास शिल्पं उभे केली. एका कलाकारापासून ते सात - आठ कलाकारांच्या गटाने मानवी शिल्पं उभे करण्याचे काम हा ग्रुप करतो. आजपर्यंत विविध संस्थांकडून २०० हून अधिक पुरस्कार या ग्रुपला मिळाले आहेत. लोक कौतुकाने प्रोत्साहनपर बक्षिस देऊ लागल्यावर त्यातील अर्धी रक्कम शैक्षणिक कामासाठी देण्याचा निर्णय ग्रुपने घेतला.

कोट
काही मंडळी कौतुकाने तर काही त्रास देण्याच्या, चित्त विचलित करण्याच्या उद्देशाने स्टॅच्युसमोर व्यक्त होतात. नावाने हाक मारतात. प्रेमाने चहा, खाणे आणून देतात; पण कलाकाराला त्या व्यक्तिरेखेच्या भूमिकेत शिरलेला असतो तो केवळ आमच्या आवाजाला प्रतिसाद देतो. आयोजकांच्या पसंतीचे शिल्प साकारण्यासाठी कार्यक्रमाआधी १५ दिवस त्यावर काम करावे लागते. या कलेतून मानवी शिल्प साकारणाऱ्या कलाकारांचे गाव अशी ओळख आम्हाला तयार करायची आहे.
- मनोज कल्याणकर, कलाकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com