महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम

महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम

rat२५१५.txt

बातमी क्र. १५ (पान ५ साठी)

महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम

प्रशिक्षण शिबिरांना प्रतिसाद; मार्चअखेर २० कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी, ता. २५ : शहरातील जी.एफ. पायपिंग सिस्टीम कंपनीने आपल्या सी. एस. आर. फंडातून कोल्हापुरातील स्वयंसिद्धा व डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यातील महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवला आहे. कार्यक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत असून यावर्षी मार्चपर्यंत जिल्ह्यात २० कार्यकम होतील, अशी माहिती डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या व्यवस्थापक विश्वस्त कांचन परुळेकर यांनी दिली.
सीएसआरप्रमुख नम्रता कांबळी व परिसर विकास अधिकारी स्वप्निल कदम यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. आतापर्यंत राजापूर नाटे येथे पापड, ड्राय स्नॅक्स, कुवारबाव येथे फ्रोजन फूड, सडामिऱ्या येथे फळप्रक्रिया, पावस येथे ड्रायक्लिनिंग, देवरुखात बांधणी, दापोली, केळशी येथे फ्रोजन फूड, ड्राय स्नॅक्स अशी प्रशिक्षणे पार पडली. तसेच उब संस्थेच्या गोधडी शिवणाऱ्या महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपले उत्पादन लक्षणीय बनवले आहे. लांजा, राजापूर, चिपळूण, मंडणगड, खेड, गुहागर येथे प्रशिक्षणे मार्चअखेर पूर्ण केली जातील. कंपनीची चालू वर्षांची सामाजिक कार्याची संकल्पना पाणी बचत असल्याने या प्रशिक्षणाच्या वेळी पाण्याचे महत्व व पाणी बचत यावर मार्गदर्शन केले जाते. घरखर्च वाचवण्यायोग्य दर्जेदार, विनाभेसळ वस्तू घरासाठी तयार करता येतात. या माध्यमातून उत्तम प्रशिक्षण व प्रेरणा मिळत असल्याचे अनेक सरपंचांनी सांगितले.
--
कोट
रत्नागिरी जिल्ह्यातील महिला शिक्षित, उत्साही, कामसू आहेत. पण त्यांना उद्योग कौशल्ये प्रदान करणे आवश्यक आहे. शासनाचा कौशल्य विकास कार्यक्रम एक महिना व त्यापेक्षा अधिक मुदतीचा आहे. घर, शेती सांभाळून एवढा वेळ काढणे गरजूंना शक्य नाही. त्यांच्यासाठी तीन तासाचे प्रशिक्षण गरजेचे आहे.
- कांचन परूळेकर, संचालिका, स्वयंसिद्धा संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com