आपत्कालीन व्यवस्थापनाची देवगडमध्ये रंगीत तालीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपत्कालीन व्यवस्थापनाची 
देवगडमध्ये रंगीत तालीम
आपत्कालीन व्यवस्थापनाची देवगडमध्ये रंगीत तालीम

आपत्कालीन व्यवस्थापनाची देवगडमध्ये रंगीत तालीम

sakal_logo
By

85244
देवगड ः येथील समुद्रात पोलिसांनी बुडत्याला वाचविण्याची रंगीत तालीम केली.

आपत्कालीन व्यवस्थापनाची
देवगडमध्ये रंगीत तालीम
देवगड ः येथील समुद्राच्या पाण्यात बुडणाऱ्याला वाचविण्याची आपत्कालीन व्यवस्थापनाची रंगीत तालीम करण्यात आली. येथील समुद्रामध्ये बोटीवरील एक मच्छीमार पाण्यात बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलिस दाखल झाले; मात्र ती पोलिसांची रंगीत तालीम होती. या मोहिमेमध्ये पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल जोशी, हवालदार अमित हळदणकर, पोलिस शिपाई विशाल वैजल, गणेश चव्हाण, नीलेश पाटील, महिला पोलिस नाईक प्राजक्ता कविटकर, होमगार्ड मंगेश जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाचा समावेश होता. पोलिसांनी तात्काळ ‘शीतल’ या मत्स्य विभागाच्या बोटीतून घटनास्थळी जाऊन समुद्राच्या पाण्यात बुडत असलेल्याला उपलब्ध साधन सामग्रीच्या आधारे वाचवले. ही आपत्कालीन व्यवस्थापनाची रंगीत तालीम दुपारच्या सुमारास राबवण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक बगळे यांनी दिली.
-----
85243
बांदा ः श्री साईबाबा पालखीचे स्वागत करताना भक्तसेवा मंडळाचे पदाधिकारी.

साईबाबांची पालखी बांद्यात
बांदा ः शहरात गोवा राज्यातून आलेल्या गोवा ते कुडाळ या साई पालखी पदयात्रेचे श्री साईबाबा भक्त सेवा मडंळाच्यावतीने भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. कुडाळ-कविलकाटे येथील भारतातील पहिल्या साई मंदिरापर्यंत ही पदयात्रा जाणार आहे. या पदयात्रेत सुमारे १०० साईभक्त सहभागी झाले आहेत. यामध्ये महिला वर्गाचाही सहभाग आहे. येथील ऐतिहासिक साई मठात या पदयात्रेचे आगमन होताच साईभक्तांचे स्वागत करून श्री साईची आरती करण्यात आली. यावेळी श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष रवींद्र मालवणकर, दर्शना केसरकर, ज्येष्ठ सल्लागार ज्ञानेश्वर केसरकर, गिरी महाजन, शैलेश केसरकर, दत्तप्रसाद केसरकर, साईराज साळगावकर, राजेश कारेकर, बंड्या हरमलकर, राज हरमलकर, राजेंद्र प्रभू आदी उपस्थित होते.