प्रेमजीभाई आसर यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेमजीभाई आसर यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शन
प्रेमजीभाई आसर यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शन

प्रेमजीभाई आसर यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शन

sakal_logo
By

rat25p21.jpg
85250
चिपळूणः प्रेमजीभाई आसर शाळेत भरविण्यात आलेले प्रदर्शन पाहताना विद्यार्थी.
----------------
प्रेमजीभाई आसर यांच्या
जयंतीनिमित्त प्रदर्शन
चिपळूणः सर्वांचा आसरा असणारे जिल्ह्याचे माजी खासदार स्व. प्रेमजीभाई आसर यांची जयंती आसर शाळेत साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका संगीता नाईक यांनी प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन केले. मीरा बेंदरकर यांनी आसर यांच्याबद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे फोटोंचे प्रदर्शन. यामध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते, समाजसेवक, क्रीडा, संगीत इत्यादी क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या फोटोंचा समावेश होता. मुख्याध्यापिका नाईक यांनी प्रदर्शन भरवण्यामागचा मुख्य हेतू सांगितला. थोर व्यक्तींची ओळख व त्यांच्या कार्याबद्दलची माहिती आपल्याला व्हावी. त्यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदर असावा, असे सांगितले. विद्यार्थ्यांना प्रत्येक फोटोविषयी माहिती प्रशालेतील शिक्षिका भावना पाटील व रोहिणी गोरिवले यांनी करून दिली. सूत्रसंचालन शर्मिला मोडक यांनी केले.
---------------------
आर्थिक नियोजनवर आज व्याख्यान
दाभोळः प्रत्येक व्यक्तीची आर्थिक नियोजनाची गरज वेगवेगळी असते. प्रत्येकाने आर्थिक नियोजन कसे करावे याची माहिती मिळण्यासाठी जयंत विध्वांस यांचे आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक या विषयावर रविवारी (ता. २६) सायंकाळी साडे सहा वाजता जालगाव येथील श्री प्रीतीवर्धन मंगल कार्यालय यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समीर फाटक व प्रशांत निजसुरे यांनी केले आहे.
---------------
चिखलगाव झाले हागणदारीमुक्त
दाभोळः दापोली तालुक्यातील ग्रामपंचायत चिखलगावांतर्गत येणारी देवके, मळे व किन्हळ ही महसूले गावे घनकचरा-सांडपाणीअंतर्गत स्वयंपूर्ण झाली आहेत. गावामध्ये १०० टक्के वैयक्तिक शौचालयाचा वापर, सार्वजनिक स्तरांवरील नाडेफ, गांडूळ खत व वैयक्तिक स्तरांवरील सर्व कुटुंबांकडे शोषखड्डे आहेत. सांडपाण्याचे व्यवस्थापन हे परसबागेला पर्याय म्हणून केलेला आहे. या गावाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून गाव घोषित केले आहे. सरपंच तथा पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष दिनेश आडविलकर यांनी सर्व ग्रामस्थांच्या संमतीने हे गाव हागणदारीमुक्त अधिक उत्कृष्ट म्हणून घोषित केले. या वेळी युनिसेफ मुंबईचे जयवंत देशपांडे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद रत्नागिरीचे कुमार शिंदे, दापोलीचे गटविकास अधिकारी दिघे उपस्थित होते.