पान एक-रिफायनरीसह सी-वर्ल्ड होणारच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-रिफायनरीसह सी-वर्ल्ड होणारच
पान एक-रिफायनरीसह सी-वर्ल्ड होणारच

पान एक-रिफायनरीसह सी-वर्ल्ड होणारच

sakal_logo
By

85184
कुडाळ ः येथे माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा. शेजारी अतुल काळसेकर. (छायाचित्र ः अजय सावंत)

रिफायनरी, सी-वर्ल्ड होणारच
अजयकुमार मिश्रा ः ''महाविकास''मुळे रखडल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ ः कोकणातील रिफायनरी आणि सी-वर्ल्ड हे दोन्ही प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने रखडवले होते; मात्र आता राज्य आणि केंद्रात आमची सत्ता असल्यामुळे दोन्ही प्रकल्प मार्गी लागतील, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. तत्पूर्वी‘लोकसभा प्रवास योजना’ अंतर्गत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दौऱ्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेत केंद्राच्या योजनांबद्दल मार्गदर्शन केले.
भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत दौरा झाला. या संदर्भात येथील एमआयडीसी विश्रामगृह येथे बैठक झाली. या वेळी लोकसभा प्रवास योजनेचे समन्वयक व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बंड्या सावंत उपस्थित होते. गृह राज्यमंत्री मिश्रा म्हणाले, ‘‘लोकसभा प्रवास योजनेतून भाजप सरकार राबवित असलेल्या योजना तळागाळापर्यंत कशाप्रकारे पोहोचतात, याची माहिती घेण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. आर्थिकस्तर उंचावण्यासाठी या योजनांमध्ये काही बदल करून जनतेच्या असलेल्या समस्या ऐकून घेण्यात आल्या. जिल्ह्यातील जनतेला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विकासासाठी आवश्यक असणाऱ्या योजना पुढील काळात कशाप्रकारे केल्या जाव्यात, याचाही आढावा घेण्यात आला.’’