रत्नागिरी ः तपास पथकाला 30 हजाराचे बक्षिस जाहीर

रत्नागिरी ः तपास पथकाला 30 हजाराचे बक्षिस जाहीर

तपास पथकाला ३० हजाराचे बक्षीस जाहीर
मासेविक्रेती महिलेचा खून; समांतर तपासाने उघडा
रत्नागिरी, ता. २५ः पिरंदवणे (ता. संगमेश्वर) येथील जंगलामध्ये किरकोळ मासे व्यावसायिक सईदा रिझवान सय्यद ( रा. हनुमान नगर, मधलीवाडी, संगमेश्वर) हिचा पैशासाठी दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नात मृतदेह जंगलात टाकला होता. काही तासांमध्ये संगमेश्वर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करत या खुनाचा उलघडा केला. या कामगिरीबद्दल तपासामध्ये सहभागी पोलिस अधिकारी व अंमलदारांना ३० हजाराचे रोख बक्षीस विभागून देण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जाहीर केले आहे.
सईदा सय्यद यांचा किरकोळ मासेमारीविक्रीचा व्यवसाय होता. १५ फेब्रुवारीला सकाळी सात ते दुपारी तीनच्या दरम्यान ताटवाशेत पिरंदवणे, संगमेश्वर येथील जंगलमय पायवाटेवरून सईदा सय्यद हिला अज्ञात व्यक्तीने मारहाण व तिच्या डोक्याला गंभीर दुखापत करून तिला ठार मारल्याचे निदर्शनास आले. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत जंगलामध्ये काही अंतरावर टाकले होते. या महिलेच्या खुनामुळे संगमेश्वर व परिसरामध्ये खळबळ उडाली होती. या संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या गुन्ह्याची उकल करण्यासाठी संगमेश्वर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त पथक तयार करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन वारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक झावरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या संयुक्त पथकाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला.
काही दिवसाच्या आतच म्हणजे २० फेब्रुवारीला गुप्त माहितीच्या आधारे पिरंदवणे बौद्धवाडी येथे राहणाऱ्या एका २३ वर्षीय संशयित युवकास नामे जयेश रमेश गमरे यास ताब्यात घेण्यात आले आहे. जयेश गमरे याने किरकोळ मासे व्यावसायिक सईदा सय्यद हिची पैशासाठी दगडाने ठेचून हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाली. त्यानंतर त्याला २१ फेब्रुवारीला अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंतकुमार शहा व पोलिस अंमलदार तसेच संगमेश्वर निरीक्षक उदय झावरे व पोलिस अंमलदार यांनी केली. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी तपासिक अधिकारी आणि अंमलदार यांना ३० हजाराचे बक्षीस (विभागून) जाहीर केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com