पुण्यातील दिव्यांग मुले सहलीसाठी सावंतवाडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील दिव्यांग मुले
सहलीसाठी सावंतवाडीत
पुण्यातील दिव्यांग मुले सहलीसाठी सावंतवाडीत

पुण्यातील दिव्यांग मुले सहलीसाठी सावंतवाडीत

sakal_logo
By

85278
सावंतवाडी ः सहलीसाठी आलेल्या दिव्यांग मुलांसह शिक्षक आदी.

पुण्यातील दिव्यांग मुले
सहलीसाठी सावंतवाडीत

सावंतवाडी, ता. २५ ः पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट, पुणे येथून पन्नास दिव्यांग मुलांची सहल मालवणच्या समुद्राचा व किल्ल्याचा आनंद घेऊन सावंतवाडी गार्डनमध्ये आज दाखल झाली. त्यावेळी ज्येष्ठ साहित्यकार विठ्ठल कदम व शिक्षक मंडळी तसेच ‘सामाजिक बांधिलकी’च्या टीमने मुलांचे शहरात स्वागत केले.
विठ्ठल कदम व दत्तकुमार फोंडेकर यांनी मुलांच्या चहापाण्याची व्यवस्था केली. तर ‘सामाजिक बांधिलकी’ने मुलांना आईस्क्रीम, चॉकलेट दिली. ‘सामाजिक बांधिलकी’ची टीम व सावंतवाडीतील शिक्षक मंडळी मुलांच्या आनंदामध्ये सहभागी झाली. मुलांनी विविध गाणी सादर करून गार्डनमधील वातावरण आनंदमय केले. १४ ते १६ वयोगटातील अंध मुलांमध्ये आत्मविश्वास आणि त्यांचे सहजरित्या वावरण्याची पद्धत प्रत्येकाला आश्चर्यचकित करणारी होती. मुलांनी येथील मोती तलाव, गार्डन राजवाडा व उभा बाजार येथील लाकडी खेळण्यांचा स्पर्शज्ञानाने आनंद लुटला. यावेळी दिव्यांग मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, कर्मचारी वर्ग व शाळेची मुले, रामचंद्र दाभोळकर, विनया कदम, दीक्षा फोंडेकर मित्रमंडळासह ‘सामाजिक बांधिलकी’चे रवी जाधव, संजय पेडणेकर, समीरा खालील, हेलन निब्रे, प्रदीप ढोरे उपस्थित होते.