‘काव्यरंग’ काव्यसंग्रहाचे कुडाळ येथे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘काव्यरंग’ काव्यसंग्रहाचे
कुडाळ येथे प्रकाशन
‘काव्यरंग’ काव्यसंग्रहाचे कुडाळ येथे प्रकाशन

‘काव्यरंग’ काव्यसंग्रहाचे कुडाळ येथे प्रकाशन

sakal_logo
By

‘काव्यरंग’ काव्यसंग्रहाचे
कुडाळ येथे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः नुकताच स्वप्ना गोवेकर लिखित ‘काव्यरंग’ कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा कुडाळ येथे नुकताच झाला. एसटी महामंडळाचे निवृत्त अधिकारी प्रकाश गोलेकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी अॅड. राजीव बिले यांनी नव कवयित्री स्वप्नाचा हा काव्यसंग्रह केवळ मनोरंजन करणारा नसून मनात विविध विचारांचे नाजूक हेलकावे निर्माण करणारे हे काव्य आहे, असे सांगितले. मराठी अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष भरत गावडे यांनी पुस्तकाविषयी मत मांडताना यांनी ''काव्यरंग''मधील कविती सृजनशील मनाचा हुंकार आहे. माणसाचे भावविश्व जणू शब्दांत मांडले आहे, असे गौरवोद्गार काढले. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे निवृत प्राध्यापक सुभाष गोवेकर यांनी मानवी जीवनाच्या अनेकविध कंगोऱ्यांना लडिवाळपणे स्पर्श करण्यात या कविता यशस्वी होतात, असे मत व्यक्त केले. मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशनाचा हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. शेवटी विकास गोवेकर यांनी सर्वांचे आभार मानले. पतंजली योग समिती, सावंतवाडी, भारत स्वाभिमान न्यास, निवृत्त कर्मचारी संघ, ज्येष्ठ नागरिक संघ, मराठी अध्यापक संघ, कळसुलकर माजी विद्यार्थी बॅच २००३, कोमसाप सावंतवाडी, अटल प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्यावतीने या काव्यसंग्रहास शुभेच्छा देण्यात आल्या.