खांब अंगावर पडून प्रौढ जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खांब अंगावर पडून प्रौढ जखमी
खांब अंगावर पडून प्रौढ जखमी

खांब अंगावर पडून प्रौढ जखमी

sakal_logo
By

खांब अंगावर पडून प्रौढ जखमी
रत्नागिरीः मिरजोळे- एमआयडीसी येथे डंपरची विजेच्या खांबाला धडक बसून खांब दुचाकीवरून जाणाऱ्या प्रौढाच्या अंगावर पडला. त्यात ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशोक यमगर (रा. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २४) सकाळी साडेनऊच्या सुमारास नाचणे ते ओमेगा फिश मिल मिरजोळे-एमआयडीसी रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद चंद्रकांत मयेकर (वय ४५, रा. गोडावून स्टॉप, नाचणे, रत्नागिरी) हे दुचाकी (एमएच-०८-एवाय-२३७७) घेऊन नाचणे ते मिरजोळे एमआयडीसी असे जात होते. अशोका गॅस कंपनी येथे त्यांच्या ओळखीचे गणेश श्रीकृष्ण खातून हे चालत जात होते. म्हणून त्यांनी दुचाकीच्या पाठीमागे बसवून घेतले. पुढे जिलानी फिशमिल कंपनीच्या पुढे कच्च्या रस्त्यावर डंपरवरील (एमएच-०८-एच-२८०९) संशयित चालक डंपर मागे घेत होता. डंपर मागे घेताना तो स्ट्रीटलाईटला धडकला व खांब श्रीकृष्ण खातू (वय ४०, रा. वांद्री संगमेश्वर) यांच्या डोक्यात पडून ते गंभीर जखमी झाले.
..........
किरकोळ कारणावरून दोन भावांमध्ये मारहाण
रत्नागिरीः शहरातील सह्याद्रीनगर येथे सख्ख्या भावांमध्ये मारहाण झाली. यामध्ये जखमी भावाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. संशयिताविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. श्रीकांत दत्तात्रय मराठे (वय ४४, गुरूविहार सोसायटी, सह्याद्रीनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २३) रात्री नऊच्या सुमारास सह्याद्रीनगर येथे घडली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमित दत्तात्रय मराठे (वय ४८, रा. गुरूविहार सोसायटी, सह्याद्रीनगर, रत्नागिरी) हे कामावरून घरी आले होते. थोड्या वेळाने संशयित श्रीकांत त्यांच्या मित्रासोबत घरी आला व ते दोघे टेरेसवर गेले. तेथे त्यांनी मद्य प्राशन केले. अमित हे आपल्या मुलीसोबत बोलत असताना अचानक भाऊ श्रीकांत यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. त्यांना बॅटने मारहाण केली. त्यानंतर संशयित श्रीकांत यांनी शहर पोलिसात खबर दिली. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलवून अमित मराठे यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
--------
मद्यधुंद व्यक्तीची कामगारांना मारहाण
रत्नागिरी ः शहरातील काँग्रेस भवन येथील एका हॉटेलमध्ये मद्यधुंद व्यक्तीने जेवण काय अशी विचारणा करून मोठमोठ्याने ओरडून दोघांना मारहाण केली. त्याच्याविरुद्ध शहर पोलिसा गुन्हा दाखल झाला आहे. ओंकार व त्यांची बहीण नागवेकर (रा. पेठकिल्ला, पूर्ण नाव माहीत नाही) असे संशयित आहेत. ही घटना गुरुवारी (ता. २३) रात्री पावणेअकराच्या सुमारास महेश लंच होम येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेश दत्तात्रय शिरधनकर (वय ५२, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) हे हॉटेलमध्ये असताना संशयिताने मद्यधुंद अवस्थेत प्राशन करून जेवणाची विचारणा करून हॉटेलमधील संदीप लक्ष्मण पाताडे व मनोहर मधुकर मांडवकर या दोघांना लाकडी बोर्ड व पीयुसी पाईपने मारहाण करून दुखापत केली तसेच अंगावरील शर्ट व गळ्यातील चांदीची चेन व हेडफोन तोडून नुकसान केले. तसेच त्यांची बहीण नागवेकर, कामगारांना शिवीगाळ केली. या प्रकरणी महेश शिरधनकर यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
--------
गोळपला गावठी दारू जप्त
पावसः रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील खाजण परिसरात हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. रवींद्र हरी शेडगे (रा. नालेवठार-पावस, रत्नागिरी) असे संशयितांचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र शेडगे शुक्रवारी हे गोळप खाजण परिसरामध्ये विनापरवाना हातभट्टीची दारू विकत असल्याची माहिती मिळताच पोलिस अंमलदार महेश कुबडे यांनी धाड टाकून त्याच्याकडे असलेली ९९० रुपयांची १७ लिटर हातभट्टीची दारू व त्यासाठी लागणारे साहित्य ताब्यात घेतले.