बंधाऱ्याचे काम करणाऱ्या ठेकेदार करतो दादागिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंधाऱ्याचे काम करणाऱ्या ठेकेदार करतो दादागिरी
बंधाऱ्याचे काम करणाऱ्या ठेकेदार करतो दादागिरी

बंधाऱ्याचे काम करणाऱ्या ठेकेदार करतो दादागिरी

sakal_logo
By

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा--लोगो

बंधाऱ्याचे काम करणाऱ्या
ठेकेदार करतो दादागिरी
स्थानिक ग्रामस्थांकडून अधिकाऱ्यांकडे तक्रारी ; माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने नाराजी
रत्नागिरी, ता. २५ः मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम काल ठेकेदाराने बंद केले. स्थानिकांबरोबर वाद झाल्यामुळे आपण काम बंद करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले; मात्र स्थानिकही आता पुढे येऊन ठेकेदाराच्या दडपशाहीविरुद्ध बोलत आहेत. बंधाऱ्याबाबत कोणतीही माहिती ठेकेदार देत नाहीत. स्थानिकांनी कामाबद्दल काही विचारले तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. ठेकेदार दादागिरी करतानाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तशा तक्रारी पत्तन विभागाकडे यापूर्वी दिल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातील दुसरी बाजूही जनतेसमोर आली पाहिजे, अशा प्रकारची स्थानिकांची तक्रार वजा बाजू आप्पा वांदरकर यांनी मांडली.
मिऱ्या बंधाऱ्याचे काम का बंद केले याची माहिती देण्यासाठी एकही अधिकारी पुढे आलेला नाही. हे शासकीय काम असल्याने शासनाने आम्हाला याबाबतची माहिती दिली पाहिजे, असेही स्थानिकांचे त्यांचे मत आहे. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी ४० वर्षांनी पूर्ण झाली आहे. पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन या भागात राहावे लागते. त्यामुळे शासनाने मंजूर केलेल्या पक्क्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम दर्जेदार व्हावे ही आमची अपेक्षा आहे. त्यासाठी कोणताही वाद न करता हे काम केले जात असले तरी स्थानिकांना कोणत्याच विषयात ठेकेदार विश्वासात घेत नाही. याबाबत आम्ही पत्तन अभियंत्यांना डिसेंबर २०२२ मध्ये निवेदन दिले आहे. त्याचे उत्तर देण्याची तसदीही पत्तन अभियंत्यांनी घेतलेली नाही. पतन अभियंता कार्यालयाचे अधिकारी जनतेसाठी काम करतात की, ठेकेदारासाठी काम करतात याचा ही खुलासा होणे गरजेचे आहे. कारण, किनारी अभियंता यांनी ११ जानेवारीला बंधाऱ्याच्या कामाची पाहणी केली. ज्या ग्रोयन्सवरती भाटिमिऱ्या येथे त्यांनी भेट दिली त्या ठिकाणचे मोठे दगड ठेकेदार उचलून दुसऱ्या ठिकाणी ग्रोयन्सवरती नेण्याचा प्रयत्न करत होता. याबाबत ग्रामस्थांनी विचारले असता ठेकेदार दादागिरी करतो. तसा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत पत्न अभियंता, सहाय्यक अभियंता व शाखा अभियंता यांनी कोणतीही भूमिका घेतली त्याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे.

कोट
नियोजित आराखड्याप्रमाणे हे काम होत नाही. त्यामध्ये प्रचंड तफावत आहे. काम असेच सुरू राहिल्यास मिऱ्या गाव समुद्रात गेल्याशिवाय राहणार नाही. या सर्व प्रकारात जनतेच्या पैशांचा दुरुपयोग झाल्याचे दिसून येईल. काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे आणि ते सिद्ध करून दाखवूच; पण ज्याच्या घराच्या मागे काम सुरू आहे त्या कामाबद्दल विचार केली तर दादागिरीची भाषा करण्याची काही गरज नाही. त्यामुळे ठेकेदारानेही दादागिरी न करता समजुतीने घेतल्यास हे वादच होणार नाहीत.
- आप्पा वांदरकर