
नारायण राणे
अजित पवारांना बारामतीत
ताकद दखवू ः नारायण राणे
कोल्हापूर, ता.२४ ः अजित पवरांनी पुण्याच्या बाहेर येऊन दुसऱ्याचे बारसे घालू नये. माझ्या फंदात तर त्यांनी पडूच नये. नाही तर बारामतीत येऊन त्यांना ताकद दाखवीन, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री राणे यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे सपत्निक कोल्हापुरात आले आहेत. आज त्यांनी पत्नीसोबत करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. अजित पवार यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना राणे म्हणाले, ‘अजित पवरांनी माझ्या नादाला लागू नये. त्यांना पुण्याच्या बाहेरचे राजकारण किती कळते माहिती नाही. मी मुंबईत राजकारण केले. नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले म्हणून कोकणातून सहा ते सात वेळा निवडून आलो. सोनिया गांधी यांनी सांगितले म्हणून बांद्र्यातून निवडणूक लढवली, तेथे माझा पराभव झाला. अजित पवारांनी माझ्या नादाला लागू नये. नाही तर बारामतीत येऊन ताकद दाखवेन.’ उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष याबद्दल राणे म्हणाले, कोणाचा पक्ष कधी संपणार हे सांगायला मी ज्योतिषी नाही. आता उद्धव ठाकरे यांच्याकडे १५-१६ आमदार आहेत. तेही त्यांना कधी सोडतील याचा नेम नाही. ठाकरे यांनी आता आत्मचिंतन करावे.’