
रत्नागिरी-सदर शिक्षण
२० फेब्रुवारी रत्नागिरी पान २ अंक- वरून लोगो व
फोटो ओळी
-rat२६p९.jpg ः गजानन पाटील
---------
शिक्षण ः लोकल टू ग्लोबल--लोगो
जिल्हा परिषदेच्या शाळा कॉर्पोरेट होणे शक्य आहे
इंग्रजी शाळा जेव्हापासून नव्या रूपात सुरू झाल्या, शाळा कार्पोरेट झाल्या तेव्हापासून जिल्हा परिषद किंवा शासकीय शाळांकडील विद्यार्थ्यांचा ओढा तसा कमी झाला आहे. अलिकडच्या चार-पाच वर्षात मात्र यात थोडाफार बदल घडून येत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळू लागलेत. मुलांना शाळा भरणेची पहिली घंटा वाजली की, दुःख होतं. कारण, त्यांना शाळेचे वातावरण, परिसर आवडत नाही; पण शाळा सुटण्याची घंटा वाजली की, त्यांना इतका आनंद होतो की त्यांच्यात प्रचंड ऊर्जा येते. हो, असं का घडतं? हा संशोधनाचाच विषय आहे. खरंतर शाळेची पहिली घंटा झाली की, मूल आनंदाने शाळेत गेलं पाहिजे आणि शाळा सुटण्याची घंटा झाली की, त्याचे पाय शाळेतून निघता कामा नयेत असं शालेय वातावरण निर्माण केलं तर मात्र विद्यार्थी शिकेल, टिकेल आणि घडेल; पण अगदी निवडक शाळा वगळता काही शाळांमध्येही घडत नाही, हे वास्तव आहे.
- डॉ. गजानन पाटील
--------------
जानेवारी २००६ मध्ये यवतमाळ डाएटला प्राचार्य म्हणून रूजू झालो. तिथे डाएटची शासकीय सरावपाठ शाळा होती. पहिली ते चौथीच्या वर्गात जेमतेम २०-३० विद्यार्थी होते. मुख्याध्यापक, शिक्षकांशी याबाबत चर्चा केली. तर त्यांनी सांगितलं की, शासकीय शाळा असल्यामुळे मुलांकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे पालक या शाळेत मूल घालण्यापेक्षा ते पैसे देऊन इंग्रजी शाळेत मुलांना घालतात. त्यांचं हे कारण ५० टक्के सत्य होतं; पण उरलेल्या ५० टक्क्यांमध्ये शालेय वातावरण योग्य नाही, वर्गखोल्या खराब, बोलक्या भिंती बोलक्या व्हरांडे नाहीत, मुलांना खेळण्यासाठी जागा नाही, मुलांना आनंद वाटावी अशी कोणतीच गोष्ट त्या शाळेत नसल्याकारणाने मुलांनी या शाळेकडे पाठ फिरवली होती. मग आम्ही डाएटची टीम, डीएड्ची मुलं सगळ्यांनी बसून यावर सखोल चर्चा केली. आपण काय काय करू शकतो, याची एक लिस्ट तयार केली. जानेवारी २००६ ते एप्रिल २००६ या कालखंडात शाळेचा आतून बाहेरून तोंडावळा पुरा बदलून टाकला. बोलक्या भिंती, बोलक्या व्हरांडे तयार केले. शाळेच्या आतमध्ये अनेक उपक्रम केले. जसे की, अभ्यास कोपरा, माझा शनिवार, डे ऑफ दी स्टुडन्टस, ग्रीन हाऊस, माझे खेळ, अन्नसाखळी, सकाळी योगा, व्यायाम, वर्ड ऑफ डे, माझा वाढदिवस, गणित कोपरा, युनिफॉर्म, विज्ञान कोपरा यासारखे उपक्रम सुरू केले. मुलं फार कमी त्यामुळे प्रत्येक मुलाकडे विशेष लक्ष देण्यात आले. प्रत्येक मुलाशी परिपाठला वैयक्तिक चर्चा संवाद करू लागलो. हळूहळू त्यांच्या पालकांशी संवाद झाला. त्या पालकांनी बदललेलं शाळेचे रूपडं सर्वांना सांगायला सुरवात केली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा अॅडमिशन सुरू झालं तेव्हा पहिली ते चौथीतील १६० मुलं भरून वरती १०-१५ मुलं वेटिंग लिस्टला राहिली. अॅडमिशनसाठी मग कोणी आमदारांचे पत्र आणलं, कोणी मंत्री महोदयांचं पत्र आणलं. तेथून पुढे जून २००६ पासून सरावपाठ शाळा मुलांच्या हसण्या-बागडण्याने भरून गेली. पहाटे ५ वा. लहान मुलं शाळेत यायची. देशभक्तीपर गीते, स्वच्छता, प्राणायाम, खेळ संवाद झाला की, ९ ला घरी जाऊन जेऊन साडेदहापर्यंत शाळेत यायची. दिवसभर शाळा फुलून जायची. मुलं रात्री उशिरापर्यंत माझ्या जवळच असायची. आमची शासकीय सरावपाठ शाळा कॉर्पोरेट झाली होती. शिक्षकांनी मनापासून उपक्रमशील राहून शाळेचे वातावरण आनंददायी केले तर जिल्हा परिषदेच्या शाळासुद्धा कार्पोरेट होऊन जातील.
(लेखक प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ व समुपदेशक असून स्तंभलेखक आहेत.)