
गाळामुळे मजगांव-केळये नदीला पूर
फोटो ओळी
- rat२६p२.jpg-KOP२३L८५३७१ रत्नागिरीः मजगाव-केळये येथील पुलाजवळचा गाळ काढण्याविषयी नाम फाउंडेशनच्या सदस्यांसोबत पाहणीवेळी सरपंच फय्याज मुकादम.
गाळामुळे मजगांव-केळये नदीला पूर
गाळ उपशाच्या मंत्री सामंतांच्या सूचना ; नाम फाउंडेशनकडून कडून सर्व्हे
रत्नागिरी, ता. २६ ः तालुक्यातील मजगांव-केळये येथील नदीपात्रात साचलेल्या प्रचंड गाळामुळे पावसाळ्यात होणारी पुरस्थिती दूर होण्यास मदत होणार आहे. येथील गाळ उपशासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पयत्नांमुळे मंजूर झालेल्या कामाचा नाम फाउंडेशनकडून नुकताच सर्व्हे करण्यात आला आहे.
रत्नागिरी मजगांव, केळये पुलाजवळ नदी पात्रात गाळ साचल्यामुळे पावसाळ्यात अनेक वेळा पुरस्थितीमुळे केळये म्हमूरवाडी, रत्नागिरी वाहतूक बंद होत असते. येथील ग्रामस्थांना अनेक वेळा वेगवेगळ्या समस्येला तोंड दयावे लागते. या स्थितीमुळे कधी कधी रुग्णांना रत्नागिरी घेऊन जाणे ही कठीण होउन जाते. तसेच आजूबाजूच्या शेतात पाणी शिरत असल्याने शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे व होत असते. गणपती विसर्जनाच्या वेळी विसर्जन करणे ही कठीण बनते तर नदीपरिसरातील आजबाजूच्या घरात पाणी शिरून घरातील साहित्याचे मोठे नुकसान होत होते.
नदीपात्रात मोठ्या पमाणात गाळ साचल्याने नदी पात्रातील पाणी साठा ही कमी होतो. त्याचा परिणाम मजगांव, केळये ,नळपाणी योजना च्या विहिरीला टंचाई समस्येला सामोरे जावे लागते. या बाबत मजगांव सरपंच फयाज मुकादम तसेच, सदस्यांनी ही पालकमंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत, शिवसेना तालुका प्रमुख बाबू शेठ म्हाप यांच्या ही बाब लक्षात आणून दिली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे हे गाळ उपशाचे काम अखेर मंजूर झाले आहे. या कामाचे पाहणी पाटबंधारे विभाग तसेच नाम फाउंडेशन यांनी केली. लवकरच या कामाची सुरवात नाम फाउंडेशन करणार असल्याचे सरपंच फय्याज मुकादम यांनी सांगितले. तसेच मजगांव नदी, केळये पवारवाडी नदीतील गाळ काढण्याचा देखील सर्व्हे झाला. गेली अनेक वर्ष नदी मध्ये गाळ साचत असल्याने वाहतूक बंद, शेतात समुद्राचा खारे पाणी भरणे, घराचे नुकसान होणे असे अनेक विषयाने केळये पवारवाडी, महामूरवाडी साकवाजवळचा गाळ काढणे तसेच माहिगीर मोहल्ला ते मिस्त्री बाग पर्यंत नदीचा गाळ काढणे गरजेचा असल्याने ही बाब मजगांव सरपंच फयाज मुकादम, केळये माजी सरपंच महेश धावडे यांनी निदर्शनास आणून दिलेली होती. त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या नदीचा सर्व्हे केला. या दोन्ही कामांना मंत्री सामंत यांनी मंजुरी दिली आहे.
चौकट
मिरजोळे येथेही नदीपात्रात होणार गाळउपसा
मिरजोळे येथील नदीपात्रातील साचलेल्या पचंड गाळाचा पावसाळ्यात पुरस्थितीचा सामना ग्रामस्थांना सोसावा लागतो. मिरजोळे नाखरेकरवाडी ते बौध्दवाडी नळपाणीपुरवठा योजनेच्या विहीरीपर्यंतच्या नदीपात्रातील गाळ काढला जावा अशी मागणी आहे. हे काम देखील मंजूर झाले असून येथीलही ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.