
चिपळूण-सती विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली
फोटो ओळी
rat26p12.jpg- KOP23L85379 चिपळूण ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करताना मुख्याध्यापक अरविंद सकपाळ व सहकारी शिक्षक.
-----------
स्वातंत्र्यवीर सावरकरांना
सती विद्यालयात आदरांजली
चिपळूण, ता. 26 ः सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खेर्डी-चिंचघरी प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या हस्ते स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषेत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. यामध्ये सुजान कांबळे, स्वरा हळदणकर, शौर्य पोटे, मृणाई महाडीक, प्रांजल खरात, आरोही निर्मळ यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वा. सावरकरांचे सागरा प्राण तळमळला हे गीत ऐकविण्यात आले व सावकरांचा जीवनपट व्हिडीओतून दाखविण्यात आला. शिक्षिका वृषाली राणे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास मुलांना सांगितला. सूत्रसंचालन सौ. रूपाली खरात यांनी केले, तर आभार वर्षा सकपाळ यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षिका सौ. मनीषा कांबळी, सौ. रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, सौ. अपूर्वा शिंदे, सौ. विनया नटे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके, सौ. शीतल पाटील, सौ. स्वरा भुरण यांनी विशेष परिश्रम घेतले.