‘रवळनाथ’ संस्थेचे कार्य प्रेरणादायी ‘रवळनाथ’ संस्थेचे कार्य प्रेरणादायी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रवळनाथ’ संस्थेचे कार्य प्रेरणादायी
‘रवळनाथ’ संस्थेचे कार्य प्रेरणादायी
‘रवळनाथ’ संस्थेचे कार्य प्रेरणादायी ‘रवळनाथ’ संस्थेचे कार्य प्रेरणादायी

‘रवळनाथ’ संस्थेचे कार्य प्रेरणादायी ‘रवळनाथ’ संस्थेचे कार्य प्रेरणादायी

sakal_logo
By

85380
कुडाळ ः ‘श्री रवळनाथ’च्या वतीने ज्येष्ठ साहित्यीक प्रवीण बांदेकर यांचा सत्कार करताना डॉ. जी. टी. राणे, व्ही. के. मायदेव, अशोक येजरे, डॉ. पाटील व संचालक. (छायाचित्र ः अजय सावंत)


‘रवळनाथ’ संस्थेचे कार्य प्रेरणादायी

प्रवीण बांदेकर; कुडाळात विविध क्षेत्रातील यशस्वीतांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः श्री रवळनाथ संस्थेने वित्तीय संस्था म्हणून काम करताना समाजात सामाजिक बांधिलकी जोपासून केलेले कार्य निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सामाजिक बांधिलकी जोपासून केलेला सन्मान सर्वांना प्रोत्साहन देणारा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनी काल (ता. २५) सत्कार सोहळ्यात केले.
येथील श्री रवळनाथ को ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड, आजरा कुडाळ शाखेच्यावतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या साहित्यिक, शिक्षक तसेच मुलांचा गौरव सोहळा संस्थेच्या कार्यालयात प्रमुख पाहुणे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जी. टी. राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक बांदेकर, ''श्री रवळनाथ''चे उपाध्यक्ष व्ही. के. मायदेव, संचालक डॉ. दत्ता पाटील, कुडाळ शाखा चेअरमन अशोक येजरे, संचालक मनोहर गुरबे, अजय चव्हाण, सानिका मदने, रुपाली शिरसाट, शाखाधिकारी विक्रम जांभेकर, कर्मचारी, सत्कारमूर्ती आदी उपस्थित होते.
यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बांदेकर, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विजय धामापूरकर, सेवानिवृत्तीपर सत्कारांमध्ये सरंबळ इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विवेकानंद बालम, डॉ. एस. एस. कुडाळकर, हायस्कूल मुख्याध्यापक पुंडलिक घाडीगावकर, आंबोली सैनिक स्कूलचे प्राचार्य सुरेश गावडे, वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगावच्या शिक्षिका अपूर्वा चव्हाण, पूर्ण प्राथमिक शाळा वालावल पूर्वच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका अनघा येजरे, जिल्हा परिषद शाळा नेरुर-गोवेरीचे पदवीधर शिक्षक प्रवीण वेटे, जिल्हा परिषद शाळा पाटसावरीच्या शिक्षिका विनया पाटील, अरबी समुद्र दहा तास ३१ मिनिटे ११ सेकंदात पार करून वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियावर झळकलेली जलतरणपटू शमिका चिपकर, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा राज्यात दहावा व जिल्ह्यात प्रथम आलेला कैवल्य मिशाळ, एमबीबीएस गोल्ड मेडलिस्ट डॉ. मोहम्मद आवटे, भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी निवड झालेली शेतकरी कुटुंबातील बाव गावची सुकन्या दीपाली गावकर आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात डॉ. दत्ता पाटील यांनी संस्थेचे चेअरमन एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था यशस्वी वाटचाल करीत आहे. संस्थेने गरजूंना नेहमीच मदतीचा हात दिला आहे. नुकसान झालेल्या गरजूंना मदत करत आरोग्य, क्रीडा, शैक्षणिक आदी क्षेत्रांत नेहमीच मदतीचा हात दिला आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन सानिका मदने यांनी केले.
--
मान्यवरांची मनोगते...
बांदेकर यांनी गरजूंना मदत करण्याचे काम संस्था करीत आहे. साहित्यिक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यापासून माझे विविध ठिकाणी सत्कार झाले. आज सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या संस्थेने आम्हा सर्वांचा केलेला सन्मान निश्चितच प्रेरणा देणारा आहे, असे सांगितले. डॉ. राणे यांनी विविध क्षेत्रांत यश प्राप्त केलेल्यांचा गौरव सोहळ्यात विविध क्षेत्रातील नावलौकिक प्राप्त केलेल्यांचा गौरव करण्याचा योग जुळून आला, हे माझे भाग्य समजतो. समाजात वावरताना समाजातील घटकांसाठी काहीतरी मदत करावी, या उद्देशाने श्री रवळनाथने टाकलेली पावले निश्चितच कौतुकास्पद आहे, असे सांगितले.