
बांदावासीयांनी पाहिला ‘मन की बात’
85386
बांदा ः ‘मन की बात’ कार्यक्रम पाहताना भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
बांदावासीयांनी पाहिला ‘मन की बात’
भाजपचा पुढाकार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीही उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २५ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम बांदा शक्ती केंद्रावर आज भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी एकत्रित पहिला. बांदा केंद्राच्यावतीने गडगेवाडी येथे मकरंद तोरसकर यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम भाजप पदाधिकारी आपल्या बुथवर कार्यकर्ते व नागरिकांसह आवर्जून पाहतात. बांदा पदाधिकाऱ्यांच्यावतीने पाहण्याचे नियोजन केले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सावंतवाडीचे माजी नागराध्यक्ष संजू परब, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मंदार कल्याणकर, बंड्या सावंत, ज्ञानेश्वर सावंत, सरपंच प्रियांका नाईक, माजी सभापती शीतल राऊळ, माजी जिल्हाध्यक्ष शामकांत काणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, बाळू सावंत, रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, रुपाली शिरसाट, तनुजा वराडकर, दीपलक्ष्मी सावंत, रेश्मा सावंत, श्रेया केसरकर, अवंती पंडित, दिक्षा नाईक, शहराध्यक्ष बाबा काणेकर, राकेश केसरकर, बाळा आकेरकर, नीलेश देसाई, मनोज कल्याणकर आदींसह भाजपचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना काळसेकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या शाश्वत विकासाचे व्हिजन मांडले. केंद्र व राज्याच्या लोकोपयोगी विकास योजना तळागातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. शामकांत काणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.