दाभोलकर, कोठावळे निबंधात प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोलकर, कोठावळे निबंधात प्रथम
दाभोलकर, कोठावळे निबंधात प्रथम

दाभोलकर, कोठावळे निबंधात प्रथम

sakal_logo
By

85383
जान्हवी दाभोलकर, गौरवी कोठावळे


दाभोलकर, कोठावळे निबंधात प्रथम

सावंतवाडीतील स्पर्धा; ‘कोमसाप’चा उपक्रम, आज बक्षीस वितरण

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पाचवी ते सातवी पहिल्या गटात जानवी दाभोलकर, तर आठवी ते दहावी दुसऱ्या गटात गौरवी कोठावळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. उद्या (ता. २७) सायंकाळी येथील मोती तलावाच्या काठी केशवसुत कट्टा येथे आयोजित मराठी भाषा दिन व जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन कार्यक्रमात विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे.
ही स्पर्धा शिवजयंतीनिमित्त शालेयस्तरावरील दोन गटांत घेण्यात आली. अमोल टेमकर यांनी आपल्या मातोश्री मंदा टेमकर यांच्या स्मरणार्थ स्पर्धा पुरस्कृत केली होती. स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात द्वितीय कोमल पास्ते (कलंबिस्त हायस्कूल), तृतीय कस्तुरी आसयेकर (मळगाव हायस्कूल), उत्तेजनार्थ कृष्णा पास्ते (सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूल), आरती कोठावळे (इन्सुली हायस्कूल), तर आठवी ते दहावी गटात द्वितीय संचित पालकर (कलंबिस्त हायस्कूल), मयुरी कारिवडेकर (कारीवडे हायस्कूल), उत्तेजनार्थ अमृता पास्ते (कलंबिस्त हायस्कूल), दिव्य कोठावळे (इन्सुली हायस्कूल) यांनी यश मिळविले. स्पर्धेचे परीक्षण प्रज्ञा मातोंडकर, आदिती सामंत, किशोर नांदिवडेकर, ऋतुजा सावंत-भोसले यांनी केले. सर्व विजेत्या स्पर्धकांनी व शिक्षकांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष अॅड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी केले आहे. सावंतवाडी कोमसापच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचे ‘कोमसाप’तर्फे अभिनंदन करण्यात आले.