खेड- जगबुडी कोंडली बिग स्टोरी

खेड- जगबुडी कोंडली बिग स्टोरी

बिगस्टोरी
फोटो ओळी
-rat२६p१५.jpg ःKOP२३L८५४००
खेड ः खेड शहरालगत वाहणारी जगबुडी नदी.
-rat२६p१६.jpg ः KOP२३L८५४०१
खेड शहरातील जगबुडी नदीकिनारी असलेला बंदर परिसर.
-rat२६p१७.jpg ःKOP२३L८५४०२
जगबुडी नदीच्या पाण्यावर तरंगत असलेला कचरा.
-rat२६p१८.jpg ः KOP२३L८५४०३
जगबुडी नदीकिनारी मटण-मच्छी मार्केटच्या कचऱ्‍यावर तुटून पडलेली कुत्री.
-rat२६p१९.jpg ः नदीपात्रातील गाळ.
-------------------

इन्ट्रो
---
कोकणातील इतर कोणत्याही नदीप्रमाणेच जगबुडी नदीची अवस्था झाली आहे. श्वास कोंडलेली, प्रदूषित, गाळाने भरलेली, इतिहासाच्या खुणा फक्त भग्नावशेषाप्रमाणे राहिलेली, जीवनवाहिनी तशीच कोपली की लक्षावधीचे नुकसान करणारी, लोकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे बकाल झालेली, पोटात कचरा साठवणारी, त्यामुळे प्रदूषित पाणी वाहून नेत नेत नदी तीरावरील आणि नदीतील जीवसृष्टीलाही धोकादायक ठरणारी अशी झाली आहे. नदीतील गाळ काढणे, प्रदूषण दूर करणे किंवा थांबवणे, नदी स्वच्छ प्रवाही करणे अशा घोषणा सतत आणि प्रयत्न मात्र कधीतरी होत असतात. ना स्थानिक प्रशासन कठोरपणे प्रदूषण मोडून काढते, ना राज्यस्तरावरील लोकप्रतिनिधी याबाबत कोणत्या संवेदना दाखवतात. अशा सर्व चिंताजनक परिस्थितीत जगबुडी वाचवा सारखी मोहीम सुरू करणाऱ्या स्वयंसेवी संस्था अथवा नदी स्वच्छ करणारी काही मंडळी म्हणजे अंधारातील पणत्या आहेत; मात्र त्याही मिणमिणत्याच. हे चित्र बदलायचे असेल तर सरकारी यंत्रणेबरोबर नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी लोकांचीच आहे, या भावनेने वागणूक होणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर गाळात बुडत चाललेल्या जगबुडीची आणि पर्यायाने तिच्यावर अवलंबून वस्तीची शोकांकिकेडेच वाटचाल चालू राहील.

- सिद्धेश परशेट्ये, खेड

जगबुडीचा श्‍वास कोंडतोय

कचऱ्‍याचे ग्रहण, गाळाने भरलेली, बकाल; स्थानिक प्रशासनाचे सुशोभीकरणाचे प्रयत्न अपुरे

ज गबुडी नदीपात्राला गेल्या काही वर्षांपासून कचऱ्‍याचे ग्रहण लागले असून, मानवनिर्मित कचरा नदीत फेकणाऱ्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच नदीपात्रात साचलेल्या वाळूच्या टेकड्यांमुळे नैसर्गिक संकटदेखील गडद होत आहे. यामुळे जगबुडी नदीचा श्वास कोंडू लागला आहे. यावर शासनस्तरावर विविध उपाययोजना सुरू आहेत; पण सद्यःस्थितीत परिस्थिती जैसे थै म्हणावी लागेल. जगबुडी नदीपात्रातील पाण्यावर गेल्या काही महिन्यांमध्ये कचरा तरंगू लागला आहे. रात्री-अपरात्री नदीपात्रात फेकल्या जाणाऱ्‍या कचऱ्‍यामुळे पाणी प्रदूषित होत आहे. हा प्रकार खेड शहरासह नदीपात्रालगत असलेल्या गावातून सर्रास घडत असला तरी नगर पालिका अथवा ग्रामपंचायत प्रशासन कारवाईसाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. कचरा टाकणाऱ्‍यांवरही कारवाईच्या बडग्याची गरज आहे. तरंगणाऱ्‍या कचऱ्‍यामुळे नदीपात्र बकाल बनले आहे. जगबुडी नदीपात्रातील पाणी वापरून कपडे धुणाऱ्‍या लोकांना पालिकेने नदीपासून दूर स्वतंत्र धोबीघाट बांधून देणे गरजेचे आहे. नदीपात्रालगत कपडे धुणाऱ्‍या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खेड शहरानजीक जगबुडी नदीकिनारी असलेल्या बंदर मार्गानजीक शासकीय जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या असून, निसर्गसौंदर्य लाभलेल्या या नदीकिनाऱ्‍याला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. या किनाऱ्‍यावरच पालिकेचे मटणमार्केट असून, त्यातून निर्माण होणारा ओला व सुका कचरा येथेच फेकला जातो. याबाबत पालिका प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. मच्छीमार्केट इमारत उपलब्ध असतानाही बंदरमार्गाच्या दुतर्फा दररोज मासळी बाजार भरत असून, या मार्गाने ये-जा करणाऱ्‍या पादचारी व वाहनचालकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.
जगबुडी किनाऱ्‍याकडील शहराचा दर्शनी भाग सुशोभित करावा यासाठी एका बाजूला लोकप्रतिनिधी व काही जागरूक नागरिक प्रयत्न करताना दिसत आहेत; परंतु दुसरीकडे याच किनाऱ्‍यावर अस्वच्छता, आरोग्यासाठी हानिकारक कचरा, अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचा वाढता विळखा चिंतेची बाब बनली आहे. स्वच्छता अभियान राबवताना केवळ काही दिवसांकरिता दाखवलेला सुज्ञपणा प्रशासन व नागरिकांनीदेखील सोडून दिल्याचे निदर्शनास येत आहे. नदीकाठी पडलेला कचरा याची साक्ष देतो. पालिका प्रशासनाने मच्छी-मटण मार्केट उभारण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत; मात्र त्या इमारतीत मासेविक्रेत्यांना बसवण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे बंदरमार्गाच्या दुतर्फा उघड्या व सार्वजनिक जागेत मासळी विक्री सुरू असल्याचे दिसून येते. मासळी खरेदीसाठी येथे येणारे याच मार्गाच्या दुतर्फा बेशिस्तपणे वाहने उभी करत असल्याने येथे वाहतूककोंडी होते तर ग्राहकांच्या मागणीनुसार मासळी विक्रेते खरेदी केलेली मासळी साफ करत असल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली असते. नजीकच्या मटणमार्केटमधून कोंबड्या, बोकड यांची कत्तल करून आवश्यक नसलेले टाकाऊ पदार्थ या मार्गाच्या बाजूलाच टाकले जात असल्याने भटकी जनावरे, कुत्री या परिसरात वावरताना नेहमीच दिसून येतात. परिणामी, आरोग्यास धोका पोहोचत आहे. जगबुडी नदीवरील भोस्ते पुलालगत पालिकेने गणेश विसर्जन घाट व प्रेक्षक गॅलरी लाखो रुपये खर्च करून उभारली आहे.

नदीकाठी पुराचा धोका
खेड शहरालगत वाहणाऱ्‍या जगबुडी नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. सह्याद्री पर्वतरांगेतील कांदोशी गावच्या डोंगररांगातून जगबुडी नदीचा उगम झाला आहे. त्यामुळे सह्याद्रीपट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की, जगबुडी नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे गेले अनेक दिवस जगबुडी नदी इशारापातळीवरून वाहत होती. त्यामुळे खेड शहरासह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला होता. दरवर्षी जगबुडी नदीला पूर येतो. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित होते.


आरटीडीएस यंत्रणा कार्यान्वित
जगबुडी नदीच्या पुराचा धोका ओळखण्यासाठी आरटीडीएस यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. दरवर्षी जगबुडी नदीच्या पाणीपातळीत होणारी वाढ, पर्जन्यमान यांच्याबाबतचे अचूक आकडे वेगवान पद्धतीने होण्यासाठी गतवर्षीच नदीवर आरटीडीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे नद्यांची पातळी वाढल्यास नदीच्या आसपासच्या गावांना तत्काळ अलर्ट देणे शक्य होणार आहे. एवढेच नाही तर पावसाचे प्रमाण वाढल्यास नियंत्रण कक्षामार्फत नागरिकांना सतर्क करणेदेखील आता सोपे व सहज झाले आहे.


बंदराचा विकासासाठी आमदार कदमांचे प्रयत्न
काळाच्या ओघात बंदर वाहतूक बंद झाली तरी त्याच्या ऐतिहासिक खुणा आजही बंदर परिसरात दिसून येतात. राज्याचे माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी जगबुडी नदीकिनारा व बंदर परिसराला गतवैभव मिळवून देण्यासाठी क्रोकोडईल पार्क प्रकल्प राबवण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, कोकण रेल्वेस्थानक याच्यापासून जवळच हा भाग आहे. नदीपात्रालगतच्या भोस्ते व देवणे परिसरातील किनारी भागात मगरींचा अधिवास निर्माण झाला आहे. नैसर्गिक सौंदर्य व मोक्याचे ठिकाण असल्याने या परिसराला सजवण्यासाठी दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम व नगर पालिका प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. खेड शहराचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करायचा असल्यास जगबुडी नदीकिनार्‍याचा दर्शनी भाग नक्कीच मोठी संधी उपलब्ध करून देणारा आहे; मात्र हे सत्यात उतरवण्यासाठी कागदावरच्या नियोजनासोबतच प्रत्यक्ष किनार्‍यावरील भागात कृतिशील प्रयत्नांची जोड देणे आवश्यक आहे. या भागातील समस्या सोडवून निधीची उपलब्धता करून पर्यटनदृष्टीने विकासात्मक कामे करणे आवश्यक आहे.

पर्यटनाला चालना मिळणे शक्य
समुद्र किनार्‍याची ओढ असलेले पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक खेडमार्गे दापोली गाठतात. या पर्यटकांना जगबुडी नदीत बोटिंग, मगरदर्शन यासारखे उपक्रम राबवल्यास शहरात पर्यटकांची संख्या निश्चितच वाढेल. त्याचबरोबर आर्थिक उलाढाल वाढण्यास व नवीन उद्योग व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होईल, यात शंका नाही. शहरानजीकच्या जगबुडी नदीपात्रात बोटिंगची व्यवस्था करण्यासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी नगरविकास खात्याकडून ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्याने निधी मंजूर झाल्याने आगामी कालावधीत या भागात पर्यटनाला चालना मिळणार आहे. नुकतीच या प्रकल्पाच्या निमित्ताने जगबुडी नदीकिनारी देवणे बंदर परिसरात आमदार कदम, मेरीटाईम बोर्ड, लघुपाटबंधारे विभाग, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली.

फोटो ओळी
-rat२६p२०.jpgः आमदार योगेश कदम -KOP२३L८५४०५
------
कोट
जगबुडी नदीमधील (भरणे बंधाऱ्यापासून) ते नारंगी नदी जगबुडी नदीला ज्या ठिकाणी मिळते तिथपर्यंतच्या पाहिल्या टप्प्यासाठी त्वरित ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, ४ लाख घनमीटर गाळ काढला जाणार असल्याने नदी गाळमुक्त होणार आहे. जगबुडी नदीला २६ जुलै २००५ व जुलै-२०२१ मध्ये महापूर आला होता. नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत होते. ही हानी पुन्हा होऊ नये याकरिता उपाययोजना म्हणून या नदीतील गाळ काढण्याची मागणी केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये ३.५ कोटींची मागणी खेड शहरातील नदीपात्राचा गाळ काढण्याच्या कामासाठी केलेली आहे.
-योगेश कदम,आमदार खेड
----------
फोटो ओळी
-rat२६p२१.jpg ः महेंद्र शिरगावकरKOP२३L८५४०६
-------
जगबुडी नदीच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेने पाच-सहा वर्षांत ठोस पावले उचलली आहेत. प्रांताधिकारी जयश्री मोरे आणि मुख्याधिकारी हर्षला राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नदीकिनाऱ्यालगत असलेल्या ग्रामपंचायतींना नदीपात्रात कचरा न टाकण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. तसेच नदीपात्रात कचरा टाकू नये, यासाठी नदीलगत ठिकठिकाणी सूचनाफलक लावण्यात आले आहेत. सांडपाण्यामुळे नदीपात्र दूषित होत असल्यामुळे नुकत्याच केलेल्या नवीन शहरविकास आराखड्यामध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची जागा निश्‍चित करण्यात आलेली आहे.
- महेंद्र शिरगावकर, स्वच्छता निरीक्षक, नगरपालिका खेड


फोटो ओळी
-rat२६p२२.jpgः उत्तमकुमार जैनKOP२३L८५४०७
जगबुडी नदी संर्वधनासाठी प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांनी देखील पुढाकार घ्यायला हवा. नदीपात्रात कचरा टाकणार्‍यांवर प्रशासनाकडून कठोर कायदेशीर कार्यवाही होणे गरजेचे आहे. नदीपात्रालगत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच हवा. त्यामुळे कचरा टाकणारे निदर्शनास येतील आणि त्यांच्यावर जरब बसेल.
- उत्तमकुमार जैन, सामाजिक कार्यकर्ते, खेड
-------
फोटो ओळी
-rat२६p२३.jpg ः गौस खतिब-KOP२३L८५४०८
खेड शहराचा कचरा जो जगबुडी नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीच्या कडेला टाकला जातो. त्यामुळे पावसाळ्यात तोच कचरा मोठ्या प्रमाणात नदीत वाहून जातो आहे. शहर परिसरात गेले दोन महिने कचरा उचलणारे कर्मचारी कमी प्रमाणात असल्यामुळे शहरात राहणारे नागरिक घरातील कचरा नदीकाठी आणून टाकत आहेत तर नदीकिनारी असलेल्या ग्रामपंचायतीदेखील आपला कचरा या ठिकाणी आणून बिनबोभाटपणे टाकत आहेत. त्यामुळे नदीपात्र दूषित होत आहे. या सगळ्या गोष्टींना पायबंद घालणे आवश्यक आहे.
- गौस खतिब, तालुकाध्यक्ष, काँग्रेस, खेड

अलसफा वेल्फेअर फाउंडेशन जगबुडी नदी संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे. खेड शहरातील साठे-पौत्रिक मोहोल्ला येथील युवकांनी एकत्रित येत सामाजिक कार्याच्या आवडीतून अलसफा वेल्फेअर फाउंडेशन या संस्थेची निर्मिती केली. ‘सेव्ह जगबुडी रिव्हर’ ही टॅगलाईन वापरून खेड शहरात व जवळच्या भोस्ते गावामध्ये सिग्नेचर कॅम्पेन अर्थात् स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या गंभीर विषयाकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. एवढ्यावरच न थांबता राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार खेड शहरात एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांची भेट घेऊन जगबुडी नदीतील प्रदुषणाचा विषय त्यांच्यासमोर मांडला तसेच शहर परिसरातून सायकल रॅलीचे आयोजन केले होते. जलदुतांच्या नदी परिक्रमेचेदेखील आयोजन जानेवारी महिन्यात करण्यात आले होते. सर्वांनी जबगुडी नदीला तिचे गतवैभव पुन्हा परत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प करू.
- शमशुद्दीन खान, अध्यक्ष, अलसफा वेल्फेअर फाउंडेशनचे, खेड.

* प्रदुषणाचा धोका वाढतोय
जगबुडी नदीपत्रात महाकाय मगरीचा मृत्यू
आढळत आहेत महाकाय मृत मगरी
गेल्या २ वर्षांच्या कालावधीत मगरी संकटात
नदी प्रदुषणाचा फटका जीवसृष्टीलाही
नदीपात्रातील मासे, मगरीसह जीवसृष्टी धोक्यात
नदीपात्रात प्रशासनाची नजर चुकवून कचरा फेकतात
तरंगणार्‍या कचर्‍यामुळे जगबुडी नदीपात्र बकाल
नागरिकांच्या आरोग्यावर धोक्याची टांगती तलवार
--------

*अशी आहे आजची स्थिती

जगबुडी नदीचा खेडला फायदा
जगबुडी ही बारमाही वाहणारी नदी
नदीकाठच्या गाववाड्यांना जीवनवाहिनी
अलीकडच्या काळात कचर्‍याने व्यापले
नदीच्या दूषित पाण्याचा फटका जाणवतो
नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला
पावसाळ्यात पुराचे संकट अधिक गडद
कचर्‍याने या नदीत वाढते प्रदूषण
पाणी पिण्यालायक राहिलेले नाही
उपायाबाबत प्रशासनाचे बोटचेपी धोरण
-------------------------------
* ऐतिहासिक बंदर गाळात रूतले
शिवकालापासून ही नदी महत्वाची
खेटक या बंदराने ओळखली जात होती
या ठिकाणी मोठमोठी गलबते येत असत
व्यापाराचे केंद्र म्हणून बंदर नाका उदयास
येथून सर्व प्रकारचा व्यापार सुरू होता
१९७०-७५च्या दरम्यान पात्र गाळाने भरले
नदीपात्रात ठिकठिकाणी वाळूची बेट तयार
या ठिकाणी येणारी गलबते बंद झाली
हे बंदर काळाच्या ओघात लोप पावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com