रत्नागिरी- पोदारमध्ये इनोवेशन लॅब

रत्नागिरी- पोदारमध्ये इनोवेशन लॅब

फोटो ओळी
-rat२६p१०.jpg- KOP२३L८५३७६
रत्नागिरी : पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इनोवेशन लॅबचे उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, मुख्याध्यापक राकेश चव्हाण व शिक्षक.
----------
पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये
इनोवेशन लॅबचे उद्घाटन
रत्नागिरी, ता. २६ : पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इनोवेशन लॅबची स्थापना करण्यात आली. पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी हे नावीन्याचा शोध घेतात. या विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण वाढविण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते. त्यांच्या या शोधवृत्तीला अधिकाधिक चालना मिळण्याकरिता या लॅबची स्थापना केली आहे.
या प्रयोगशाळेचे उद्घाटन फिनोलेक्स अॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पालक शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या प्रयोगशाळेमध्ये कार्य करण्याकरीता विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक रोबोट, लॅपटॉप, थ्री डी प्रिंटर, एआय इकोसिस्टिम, इतर संसाधनांनी ही प्रयोगशाळा सुसज्ज आहे. या प्रयोगशाळेद्वारे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण व प्रगत तंत्रज्ञानाचा प्रात्यक्षिके करण्यासाठी लाभ होणार आहे. या इनोवेशन लॅबची संकल्पना विद्यालयाचे मुख्याद्यापक राकेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने साकार झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com