डी. आर. खवणेकरांमुळे पिढी संस्कारक्षम

डी. आर. खवणेकरांमुळे पिढी संस्कारक्षम

८५४२९

डी. आर. खवणेकरांमुळे पिढी संस्कारक्षम

डॉ. सदानंद मालवणकर; भंडारी हायस्कूलमध्ये अर्ध पुतळ्याचे अनावरण

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २६ : स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात येथील भंडारी हायस्कूलचे तत्कालीन मुख्याध्यापक गुरुवर्य डी. आर. खवणेकर आणि त्यांच्या गुरुजनांच्या टीमने जे ज्ञानदानाचे कार्य केले त्यामुळेच एक संस्कारित पिढी निर्माण झाली. संस्कारक्षम पिढी घडविण्यास खवणेकर यांचा सिंहाचा वाटा असल्याने या ज्ञान मंदिरात वावरणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्याचा वारसा पुढे चालविण्यासाठी त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवून कार्य करावे, असे प्रतिपादन भाभा अणुसंशोधन केंद्राचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ. सदानंद मालवणकर यांनी येथे केले.
येथील भंडारी ए. सो. हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रशालेचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य खवणेकर यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण स्वर्गीय डी. आर. खवणेकर यांचे पुत्र चंद्रशेखर खवणेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, कौन्सिल ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सुधीर हेरेकर, संस्थेचे उपाध्यक्ष बी. जी. गोलतकर, सह खजिनदार अभिमन्यू कवठणकर, संस्थेचे लोकल कमिटीचे अध्यक्ष दशरथ कवटकर, लोकल कमिटीचे खजिनदार जॉन नऱ्होना, रवींद्र वराडकर, मुख्याध्यापक वामन खोत, माजी विद्यार्थी अरविंद म्हापणकर, प्रकाश कुशे, अंकुश करलकर, भाऊ हडकर, रमेश आचरेकर, विष्णू कोरगावकर, कुमुद मालवणकर, नीलम करंगुटकर, समर्थपल्लवी तारी-खानोलकर, मनोरमा खवणेकर, यतिन खवणेकर, योगेश मूळे, गीता खवणेकर, यथार्थ खवणेकर, मधुकर चव्हाण, पर्यवेक्षक एच. बी. तिवले, माजी मुख्याध्यपिका एस. एस. टिकम, सदाशिव गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मुख्याध्यापक खोत यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले तर स्वर्गीय गुरुवर्य डी. आर. खवणेकर यांच्या कार्याचा आढावा प्रफुल्ल देसाई यांनी घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व आदरणीय आणि अलौकिक असे होते आणि प्रत्येकजण शिकले पाहिजे ही त्यांची भावना होती. त्यांनी कठोर परिश्रम घेतले आणि त्याकाळी ही शाळा घडवली. त्याकाळी खवणेकरांची शाळा अशी लोकांनी ओळख बनली होती. या शाळेमध्ये आता अनेक उपक्रम सुरू आहेत. त्या सर्व उपक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे सांगितले. यावेळी रवींद्र वराडकर आणि बी. जी. गोलतकर यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी विद्यार्थी मधुकर चव्हाण यांचा संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल देसाई यांनी केले.
--
खवणेकर गुरुजी हाडाचे शिक्षक
डॉ. मालवणकर म्हणाले, ‘‘आमचे मुख्याध्यापक गुरुवर्य खवणेकर शिस्तीचे होते आणि त्यांचे सहकारी शिक्षकही त्याच ताकदीचे असल्याने या सर्वांनी मिळून आम्हाला घडवले आहे. त्यामुळे खवणेकर गुरुजींचे विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रामध्ये अव्वलच आहेत. ते हाडाचे शिक्षक, उत्कृष्ट प्रशासक, उत्कृष्ट वक्ते, अतिशय कर्तव्यदक्ष शिक्षक होते. अभ्यासातच नव्हे तर त्यांच्या कारकीर्दमध्ये खेळामध्ये देखील भंडारी हायस्कुलचा पहिला नंबर लागायचा. अशा या गुरुवर्यांच स्मारक शाळेच्या आवारात असावे असे आम्हाला जेव्हा जेव्हा शाळेत यायचो तेव्हा तेव्हा वाटायचे. त्यामुळे त्यांचे एक स्मारक असावे, त्यांचा एक मोठा फोटो असावा असे आमचे स्वप्न होते. आज त्या स्वप्नांची पूर्तता होत आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने कार्य केल्यास या शाळेचा नावलौकिक आणखी वाढेल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com