
साखरपा-कबनूरकर स्कूलमध्ये स्वा. सावरकरांच्या चरित्राला उजाळा
\
फोटो ओळी
-rat26p28.jpg-KOP23L85454 साखरपा : मार्सेलीस येथील ऐतिहासिक उडीबाबत बोलताना कौस्तुभ बने.
--------------
कबनूरकर स्कूलमध्ये
सावरकरांच्या चरित्राला उजाळा
साखरपा, ता. २६ : कोंडगाव येथील श्रीमान दत्तात्रय कबनूरकर इंग्लिश मिडियम स्कूल येथे सावरकर पुण्यतिथीनिमित्त सावरकर चरित्राचे स्मरण करण्यात आले. या वेळी विनोद केतकर आणि धनंजय प्रभुघाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्य कबनूरकर स्कूलमध्ये त्यांचे स्मरण करण्यात आले.
सावरकर यांनी मार्सेलीस बंदरात मोरीया बोटीतून मारलेल्या ऐतिहासिक उडीचे स्मरण करण्यात आले. आठवीतील विद्यार्थी कौस्तुभ बने याने या उडीविषयी सविस्तर माहिती दिली. धनंजय प्रभुघाटे यांनी सावरकर यांची दूरदृष्टी या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सावरकरांची दूरदृष्टीत शिवाजी महाराजांच्या विचाराचे प्रतिबिंब दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. विनोद केतकर यांनी सावरकर साहित्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तुरुंगवासात असताना कोणतेही लेखन साहित्य नसताना कमला सारखे महाकाव्य सावरकरांनी कसे लिहिले याची माहिती त्यांनी दिली.१८५७ चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ तर अजरामर असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी मुख्याध्यापिका लिना कबनूरकर उपस्थित होत्या.