कलंबिस्त पूल लवकरच पूर्ववत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलंबिस्त पूल लवकरच पूर्ववत
कलंबिस्त पूल लवकरच पूर्ववत

कलंबिस्त पूल लवकरच पूर्ववत

sakal_logo
By

कलंबिस्त पूल लवकरच पूर्ववत

शालेयमंत्री दीपक केसरकर; सरपंच सावंतांनी वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः कलंबिस्त येथील महत्त्वाकांक्षी आणि गेल्या पूरस्थितीत तुटलेल्या पुलाच्या दुरुस्तीसाठी महिनाभरात निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज दिले. कलंबिस्त गावच्या सरपंच सपना सावंत यांनी याप्रश्नी मंत्री केसरकर यांचे लक्ष वेधले. सावंत यांनी या संदर्भात मंत्री केसरकरांशी ऑनलाईन चर्चा केली. गावातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे साकडे घातले. यावेळी कलंबिस्त ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पास्ते, शाहू पास्ते, पांडुरंग पास्ते, उदय सावंत, जीवन लाड, संजीव पालकर आदी उपस्थित होते. सावंत यांनी मंत्री केसरकरांचे लक्ष वेधताना कलंबिस्त गावातील कुलदैवत सातेरी मंदिराकडे जाणारा पूल आपल्या प्रयत्नाने मंजूर होऊन तो उभारण्यात आला. अडीच कोटी खर्च करून हा पूल बांधण्यात आला; मात्र पहिल्याच पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पुलाचा अर्धा भाग तुटून गेला. त्यामुळे या भागात येजा करणाऱ्या शेतकरी व धामणमळा भागातील बहुसंख्य शेतकरी, ग्रामस्थांचे हाल झाले. याची दखल घेऊन पावसाळापूर्वी हा पूल पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच गावातील शैक्षणिक, आरोग्य, रस्ते आदी मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती वजा मागणी केली. यावेळी मंत्री केसरकर यांनी निश्चितपणे पुलासाठी निधी उपलब्ध करून लवकरच येथील ग्रामस्थांची गैरसोय दूर केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे गेली काही महिने रखडलेल्या या पुलाचे काम आता मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाली आहे.