
तुळसमधील रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
85455
वेंगुर्ले ः रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करताना वेताळ प्रतिष्ठानचे विवेक तिरोडकर. शेजारी प्रा. सचिन परुळकर आदी.
तुळसमध्ये ३३ जणांचे रक्तदान
नेहरू युवा केंद्र, ‘वेताळ’च्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
वेंगुर्ले, ता. २६ ः नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने स्वैच्छीक सेवा आणि सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ३३ जणांनी रक्तदान केले. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसचे हे सलग २० वे रक्तदान शिबिर होते.
श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन तुळस गावच्या सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच शंकर घारे, उपसरपंच सचिन नाईक, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, सदस्या चरित्रा परब, रतन कबरे, अपर्णा गावडे, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष अॅलिस्टर ब्रिटो, श्रीकृष्ण कोंडूस्कर, राजेश पेडणेकर, पत्रकार संजय पिळनकर, महेश राऊळ, सुजाता पडवळ, प्रतिष्ठान अध्यक्ष विवेक तिरोडकर, उपाध्यक्ष प्रदीप परुळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित आळवे, लाईफ ओके पलतडचे बाबली शेटकर, महेश अरोसकर आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला आणि लाईफ ओके पलतड यांचे सहयोगी संस्था म्हणून सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी नियोजनासाठी माधव तुळसकर, मंगेश सावंत, सद्गुरु सावंत, राजू परुळकर, प्रांजल सावंत, वैष्णवी परुळकर, अक्षता गावडे, हेमलता राऊळ, रोहन राऊळ, सदाशिव सावंत, सागर सावंत, कृष्णा सावंत, निखिल ढोले, ओंकार राऊळ, प्रसाद भणगे यांनी मेहनत घेतली. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे प्रतिष्ठानच्यावतीने चंदनाचे रोप देऊन आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर तर आभार गुरुदास तिरोडकर यांनी मानले.