साखरपा-संक्षिप्त

साखरपा-संक्षिप्त

-rat26p30.jpg-KOP23L85459 साखरपा : देवळे येथील आजोबा उद्यान
---------

वडिलांच्या स्मृतीत साकारले
देवळेत आजोबा उद्यान
साखरपा : नजीकच्या देवळे येथे आजोबा उद्यान साकारण्यात आले आहे. वृद्ध आणि लहान मुलांसाठी हे उद्यान उपयोगात येणार आहे. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरून देवळे गावात येताना वाणी थांबा लागतो. या थांब्यानजीक हे उद्यान उभारण्यात आले आहे. मूळचे देवळे गावाचे ग्रामस्थ आणि सध्या व्यवसायानिमित्त देवरूख येथे स्थायिक झालेले उद्योजक संदीप राव यांनी वडील अशोक राव यांच्या स्मरणार्थ हे उद्यान स्वखर्चाने उभारले आहे. हॉटेल व्यावसायिक शिवाजी शेट्ये यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे संदीप राव यांनी सांगितले. सध्या या उद्यानाला विद्युत रोषणाई करण्यात आली असून रात्रीच्यावेळी हे उद्यान पाहणे हा आकर्षणाचा विषय ठरत आहे. उद्यानातील आपले देवळे ही अक्षरे लक्ष वेधून घेत आहेत.

फोटो ओळीKOP23L85460
-rat26p31.jpg- संतोष पोकडे
---------
राष्ट्रवादीच्या पावस विभाग अध्यक्षपदी पोकडे
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील डोर्लेचे सुपुत्र संतोष पोकडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पावस विभाग अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली. आंबा व्यावसायिक व उत्पादकांचे प्रश्न, कोकण काजू बोर्ड स्थापन करण्यासाठी प्रयत्न, पावस विभागातील महिला बचत गटांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पोकडे यांनी प्रयत्न केले आहेत. रत्नागिरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजन सुर्वे यांनी पावस विभाग अध्यक्षपदाची गेले कित्येक दिवस रिक्त असलेल्या जागेवीर पोकडे यांची नियुक्ती केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com