दापोली, रत्नागिरी, उद्धव ठाकरेंच्या हीटलिस्टवर

दापोली, रत्नागिरी, उद्धव ठाकरेंच्या हीटलिस्टवर

पान १ साठी

दापोली, रत्नागिरी, उद्धव ठाकरेंचे लक्ष्य
निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू; सावंतवाडीसह तीन उमेदवार निश्चिती
चिपळूण, ता. २६ ः शिवसेनेतून फुटलेल्या ४० आमदारांनी शिवसेनेचा ५७ वर्षांचा वारसा संपुष्टात आणल्याने आता हे ४० आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत, यासाठी उद्धव ठाकरे यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. दापोली, रत्नागिरी आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उद्धव ठाकरेंचे लक्ष्य आहे.
विधानसभेला बराच अवधी असला तरी पक्षाच्या उमेदवाराला पुरेसा वेळ मिळावा यासाठी फुटीर आमदारांविरोधात तगडा उमेदवार शोधून त्यांना तसा संदेश द्यायला उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये शिवसंपर्क मोहीम आयोजित करून तेथील पक्षाची ताकद, विरोधी उमेदवाराची ताकद तसेच स्थानिक राजकीय समीकरणे आदींचा आढावा घेण्याचे कामही सुरू झाले आहे. शिवसेनेतून एकाचवेळी ४० आमदार फुटल्याने एकनाथ शिंदे यांना या आमदारांच्या जोरावर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पायउतार करणे सहजशक्य झाले. या आमदारांमुळे राज्यातील ठाकरे सरकार तर गेलेच, पण आता त्याचा परिणाम शिवसेना पक्षावरही झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्षाचे नाव तसेच धनुष्यबाण हे चिन्हही गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जन्माला घातलेला पक्ष असा एकाएकी हातातून जाणे शिवसेना नेतृत्वाच्या पचनी पडलेले नाही.
उमेदवारांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी वर्षभर आधीपासूनच त्यांना लढण्यासाठी परवानगी देण्यास उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली आहे. ठाकरे स्वतः विभागनिहाय दौरे करणार आहेत. ५ मार्चला ते खेडच्या दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांचा यावेळी शिवसेनेत प्रवेश होणार आहे. शिवसंपर्क मोहिमेंतर्गत मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. कोणत्या मतदारसंघात आपल्या पक्षाची किती ताकद आहे, किती पुरुष व महिला कार्यकर्ते आहेत, याशिवाय विरोधी पक्षाची काय ताकद आहे, तिथल्या स्थानिक आमदाराचा पराभव करण्यासाठी कशी व्यूहरचना आखता येईल याचा आढावा घेतला जात आहे. दापोलीत शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या पक्षातर्फे माजी आमदार संजय कदम यांना उभे करण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे समजते. रत्नागिरीचे मंत्री सामंत आणि सावंतवाडीमध्ये मंत्री केसरकर यांच्या विरोधात लढण्यासाठी शिवसेनेकडे तगडा उमेदवार नाही. त्यामुळे या दोन जागा आपल्याकडे ठेवायच्या की, मित्रपक्षाला द्यायच्या याबाबतची चाचपणी सुरू आहे.


उमेदवारांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी वर्षभर आधीपासूनच पक्षप्रमुख उमेदवार निश्चित करणार आहेत. मतदारसंघनिहाय ते आढावा घेणार आहेत. शिवसंपर्क मोहिमेबरोबरच त्यांचे सर्व मतदारसंघांवर लक्ष असणार आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. कोणत्या जिल्ह्यात पक्षाची आणि विरोधकांची किती ताकद आहे, याचा ते आढावा घेणार आहेत. स्थानिक आमदाराचा पराभव करण्यासाठी कशी व्यूहरचना आखता येईल याचा आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत.
- विनायक राऊत, खासदार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com