गुहागर-माजी आमदार कदमांचा निर्णय दुर्दैवी आणि अयोग्य

गुहागर-माजी आमदार कदमांचा निर्णय दुर्दैवी आणि अयोग्य

८५४७०

पान १ साठी)


कदमांचा सेनेत जाण्याचा निर्णय दुर्दैवी
खासदार सुनील तटकरे; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून सरकार पळ काढतेय
गुहागर, ता. २६ : माजी आमदार संजय कदम ५ मार्चला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेशी लढत देऊन राष्ट्रवादीचे आमदार झाले. आता त्यांनी उद्धवजींच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र, सध्या राज्यात ज्या वेगाने घडामोडी घडत आहेत, त्या पार्श्वभूमीवर आम्ही मविआ म्हणून एकत्र लढण्याचे निश्चित केले आहे. अशावेळी राष्ट्रवादीपुरते बोलायचे झाले तर त्यांचा निर्णय दुर्दैवी आणि अयोग्य आहे.
गुहागर दौऱ्यावर आलेल्या खासदार सुनील तटकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘‘राज्यात विजेचे उत्पादन आणि मागणी सारखी आहे. आरजीपीपीएलची वीज महागडी असल्याने अन्य खरेदीदार मिळत नाही. हा प्रकल्प चालू राहण्यासाठी भारत सरकारने यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे. ग्रामपंचायत निवडणुका मविआ म्हणून लढलो असलो तरी तेथे कोणाला किती जागा मिळाल्या याचा निश्चित आकडा कळू शकत नाही. खरा कस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागेल. मात्र, राज्यातील मायबाप सरकारने अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडविल्या आहेत. हे सरकार निवडणुकांपासून पळ काढत आहे. या निवडणुका ताबडतोब घ्याव्यात. त्यात खरी शक्ती समजेल.’’
बाळासाहेब आंबेडकरांनी रामपूरमध्ये कुळ कायद्याबाबत काही झाले नाही, असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना तटकरे म्हणाले, ‘‘विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना रत्नागिरीत झालेल्या अधिवेशनात बेदखल कुळांचे प्रश्र्न सोडविण्यासाठी कुळ कायद्यामध्ये बदल केला. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. काही बेदखल कुळांना नव्या कायद्याचा लाभही मिळाला. मात्र, त्याची निश्चित आकडेवारी नाही. लोकसभा सदस्य म्हणून खासदार निधीतून आणि केंद्राच्या पर्यटन, सागरमाला, भारतमाला, जलसंपदा, मत्ससंपदा योजनेतून काही कामे सुचवली आहेत. मध्यंतरी कोविडमुळे खासदार निधी थांबवला होता. यातील काही कामे केंद्राने राज्याकडे पाठवली. त्यामुळे नेमकी किती कामे पुढे सरकली हे आज माहिती नाही. मार्च महिन्यात त्याची तपशीलवार माहिती मिळेल. खासदार निधीला मर्यादा आहेत, परंतु महाविकास आघाडीचे सरकार असताना यांच्यामार्फत ग्रामविकास खात्यातून, जिल्हा नियोजनातून अनेक कामे मंजूर झाली आहेत. प्रस्तावित केली आहेत.’’

चौकट
मुख्यमंत्रिपदासाठी
पक्षात स्पर्धा नाही
माझ्याही मनात कोण मुख्यमंत्री व्हावे हे जरूर आहे; पण योग्य वेळ येईल त्यावेळी माझी भावना पक्षश्रेंष्ठीपुढे मी मांडेन. राष्ट्रवादीत कधीच स्पर्धा नव्हती. फलक लावणे चुकीचे आहे. लोकशाही पद्धतीने आम्ही नेता निवडतो, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.


कसबा, चिंचवडमध्ये
भाजप अडचणीत
कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुकीत मविआने भाजपसमोर जबरदस्त आव्हान उभे केले आहे. कसबा नेहमीच भाजपचा राहिला तरीही ऑक्सिजन लावून खासदार गिरीश बापट यांना प्रचारात आणावे लागले. या पूर्वीही आजारी असताना मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना भाजपने मतदानासाठी आणले. यावरून भाजप सत्तेसाठी किती केविलवाणी झाली आहे ते समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com