Thur, June 8, 2023

फोंडाघाट येथे आगीत
झोपडी जळून खाक
फोंडाघाट येथे आगीत झोपडी जळून खाक
Published on : 26 February 2023, 3:11 am
85485
फोंडाघाट ः येथील कातकरी समाजाच्या झोपडीला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक झाले.
फोंडाघाट येथे आगीत
झोपडी जळून खाक
कणकवली ः फोंडाघाट येथील कातकरी समाजातील सीताराम शांताराम निकम यांच्या झोपडीवजा घरास पहाटेच्या सुमारास आग लागून पूर्ण झोपडी जळाली. यामध्ये त्यांचे प्रापंचिक साहित्य पूर्णपणे जळाले. तसेच धान्यसाठा व कपडेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आज सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या आगीत निकम कुंटुंबीयांचे १५ हजाराचे नुकसान झाले. फोंडाघाट परिसरात कातकरी समाजाची वस्ती आहे. मसुलचे तलाटी आणि फोंडाघाट पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार श्री. वंजारे यांनी पंचनामा केला.