
ओझरम येथे मारहाण प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल
ओझरम येथे मारहाण प्रकरणी
तिघांविरोधात गुन्हा दाखल
कणकवली,ता.२६ ः ओझरम (ता.कणकवली) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार शनिवारी (ता.२५) दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरी घडला होता. संजय सुरेश मिठबावकर, संदीप सुरेश मिठबावकर आणि भाचा सुजल अनिल बांदिवडेकर (सर्व रा. ओझरम), अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत रमाकांत दत्ताराम मिठबावकर (वय ५२, रा. ओझरम-फौजदारवाडी) यांनी येथील पोलिसात दिलेल्या फिर्यादी वररून संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, आपण बहिणीला मदत करतो, असा आरोप करून दोन पुतणे व भाच्याने शिविगाळ करत मारहाण केली. आपण सामाईक जमिनीत बहिण राजश्री राजेंद्र चव्हाण हिला मदत करत असल्याच्या रागाने पुतण्या संदीप व संजय आणि भाचा सुजल यांनी शिविगाळ करून मला दांड्याने व पत्नीला लाकडी स्टुलने डाव्या हाताला व पायाला मारहाण करून दुखापत केली आहे. दरम्यान, फिर्यादीच्या तक्रारीची दखल घेऊन संशयितांविरोधात पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल केले. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.