साटेली भेडशीत दर्जेदार आरोग्यसेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साटेली भेडशीत दर्जेदार आरोग्यसेवा
साटेली भेडशीत दर्जेदार आरोग्यसेवा

साटेली भेडशीत दर्जेदार आरोग्यसेवा

sakal_logo
By

85496
साटेली भेडशी ः प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुसज्ज इमारतीचे लोकार्पणावेळी उपस्थित मान्यवर.


साटेली भेडशीत दर्जेदार आरोग्यसेवा

दीपक केसरकर ः प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण


दोडामार्ग, ता. २६ ः अनेक वर्षे मागणी असलेले साटेली भेडशी येथील सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे आरोग्य सेवा अधिक दर्जेदार होईल, असे प्रतिपादन मंत्री दीपक केसरकर यांनी केले. माझे तालुक्यावर विषेश लक्ष असून येथील विविध मोठ्या विकास कामांसाठी शिंदे सरकारच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यापुढेही आपण व पालकमंत्री रवींद्र चव्हाण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध आहोत, अशी ग्वाहीही शालेय शिक्षणमंत्री केसकर यांनी आज दिली.
तालुक्यात नव्याने सुसज्ज बांधलेल्या साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक दयानंद कांबळी, तहसीलदार अरुण खानोलकर, डॉ. रमेश करतसकर, डॉ. सारंग, डॉ. तुषार चिपळूणकर आदी मान्यवर उपस्थित होते. आरोग्य अधिकारी कांबळे यांच्या समवेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, गोपाळ गवस, शैलेश दळवी, तीलकांचन गवस, माजी सरपंच नामदेव धरणे, संदीप गवस, मायकल लोबो आदींच्या उपस्थितीत फित कापून व नामफलकाचे अनावरण करून आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण केले.
मंत्री केसरकर म्हणाले, ‘‘तत्कालीन आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी जिल्ह्यातील तीन सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केली. आज उपस्थित राहू शकलो नाही तरी आमचे पूर्ण लक्ष जिल्ह्यावर आहे. भूमिपूजनासाठी आम्ही कोणताही काम अडवून ठेवले नाही. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयासाठी २ कोटीचे १९ लाख रुपये दिले. तालुका क्रीडांगण, हेवाळे ब्रिज, नगरपंचायत इमारत व नाट्यगृह मंजूर केला आहे, ही सर्व कामे सुरू होतील. जिल्हा नियोजनमधून पालकमत्र्यांनी साडेपाच कोटी मंजूर केले आहेत. त्यामुळे झाले गेले सर्व विसरून साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र कसे व्यवस्थित चालेल हे पाहुया.’’
---
ग्रामीण भागावर विशेष लक्ष
पालकमंत्री चव्हाण म्हणाले, ‘‘खूप चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात आरोग्य सेवा उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ग्रामीण भागात डॉक्टर, नर्सेस आवश्यक आहेत. सर्व आरोग्य केंद्रे सक्षम होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार दीपक केसरकर या सर्वांच्या नेतृत्वाखाली या आरोग्य केंद्रांतर्गत दर्जेदार सेवेसाठी सरकार म्हणून कटिबद्ध आहोत. या सुसज्ज आरोग्य केंद्रामुळे निश्चितच साटेली भेडशी परीसरात आरोग्य सुविधा अधिक दर्जेदार बनेल.’’