संक्षिप्त

संक्षिप्त

rat२७१८. txt

बातमी क्र.१८ (टुडे पान ३ साठी)
------
rat२७p७.jpg
८५५५०
ओळी ः निवड झालेले खेळाडू सोबत प्रशिक्षक राजेंद्र यादव आदी.
-

सिझन बॅाल क्रिकेट ट्रॉफीसाठी
देसाई अॅकॅडमीतील ६ खेळाडूंची निवड

रत्नागिरी ः चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे पवन तलाव मैदानवर खेळविण्यात येणाऱ्या १४ वर्षांखालील सिझन बॅाल लिटील चॅम्पियन क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या लिलाव प्रक्रियेत येथील कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीच्या सहा खेळाडूंची निवड झाली. या स्पर्धा चार संघामध्ये लिग पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत. प्रत्येक संघ मालकाने तज्ञ व अनुभवी प्रशिक्षकाची नियुक्ती संघ व्यवस्थापक म्हणून केली आहे. स्पर्धेतील चारही संघात जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील उत्कृष्ट खेळाडुंची फॉईटनुसार निवड करण्यात आली आहे. कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीच्या कुणाल गावडे याच्याकडे चिपळूण टायटन संघाचे कर्णधारपद देण्यात आले असून राजेंद्र यादव यांची संघ व्यवस्थापक व प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. तसेच अॅकॅडमीतील अनिष भाटकर, अनुज देसाई, गुरु प्रसाद म्हस्के, चिन्मय मुद्राळे व विघ्नेश मुकादम या इतर खेळांडुंची इतर संघात निवड करण्यात आली आहे. अॅकॅडमीचे अध्यक्ष गजेंद्रशेठ पाथरे व सचिव दिपक देसाई यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले असून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

--

- rat२७p८.jpg
८५५५१
ओळी ः राजे ग्रृपतर्फे सामाजिक कार्यकर्ते रवीशेठ राजवाडकर यांचा यथोचित सन्मान.
----

सामाजिक कार्यकर्ते राजवाडकरांचा सन्मान

रत्नागिरी ः तालुक्यातील मालगुंड-जोशीवाडी येथील राजे ग्रृप या सेवाभावी संस्थेतर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविशेठ राजवाडकर यांचा संस्थापक अध्यक्ष बावा आग्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजवाडकर हे भगवतीनगर राजवाडी येथील रहिवासी असून ते मुंबईमध्ये कामानिमित्ताने कार्यरत असतात. ग्रामीण भागातील विविध सेवाभावी उपक्रमात त्यांचे योगदान असते. परिसरातील विविध सामाजिक संस्थांसाठी व गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी धावून जाण्यात त्यांचा वाटा मोलाचा असतो. ठरल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राजे ग्रुपने त्यांचा सन्मान केला. त्यांनी राजे ग्रुपला शिवजयंती निमित्त कार्यक्रमासाठी दिलेल्या देणगीतुन फळवाटप कार्यक्रम मालगुंड येथील जीवन शिक्षण प्राथमिक शाळेत करण्यात आला. या कार्यक्रमाला उपाध्यक्ष संजय दुर्गवळी, कार्याध्यक्ष निलेश भातडे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शिंदे मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे संचालक रोहित मयेकर, ग्रामपंचायत सदस्या स्मिता दुर्गवळी, सदस्या दिव्यता आग्रे, माधव अंकलगे, डॉ. मधुरा जाधव, साईनाथ जाधव, वैष्णवी मोरे, वैभव पवार, सुनील लोगडे आदींसह राजे ग्रुपचे सर्व सदस्य व अन्य उपस्थित होते.

--

मालगुंड येथे प्रवासी पिकअपशेड

रत्नागिरी ः तालुक्यातील मालगुंड जोशीवाडी येथील राजे ग्रुपने मालगुंड बाजारपेठेमध्ये दत्त मंदिर स्टॉप येथे गावातील प्रवाशांच्या सोयीसाठी पिकअपशेड उभारण्यात आली आहे. या पिकअपशेडचे उद्घाटन जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मालगुंडचे तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजेंद्र शिंदे, राजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाबा आग्रे, कार्याध्यक्ष निलेश भातडे, उपाध्यक्ष संजय दुर्गवळी यांच्यासह पोलिस हवालदार राहूल जाधव, पोलिस नाईक प्रशांत लोहळकर उपस्थित होते. शिवजयंतीनिमीत्त रक्तदान शिबिर घेण्यात आले.

--

वरवडे येथे नेत्रतपासणी शिबिर

रत्नागिरी ः दिवालीबेन मोहनलाल मेहता लायन्स आय हॉस्पिटल रत्नागिरी आणि शिवजयंती उत्सव वरवडे यांच्या संयुक्त विद्यामाने वरवडे येथील मारुती मंदिर -भंडारवाडा येथे मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिर उत्साहात झाले. या शिबिरात ४० रुग्णांनी लाभ घेतला त्यांना अल्प दरात चष्मावाटप करण्यात आले. या तपासणी शिबिरात सहा जणांना मोतीबिंदू आढळून आले त्यांचे ऑपरेशन लायन्स हॉस्पिटल येथे करण्यात आले.

--------

केवळ फोटो
ओळी
- rat२७p९.jpg-
८५५५२
देवरुख ः येथील विरेश्वर व जंगम समाज आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करताना बापु गांधी, मृणाल शेट्येआणि अन्य ग्रामस्थ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com