200 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

200 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता
200 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता

200 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता

sakal_logo
By

rat२७१७.TXT

बातमी क्र. १७ (टुडे ३ साठी)

२०० कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता

काजू फळपिक विकास योजना ः पाच वर्षांचा कालावधी

रत्नागिरी, ता. २७ ः कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांसह प्रमुख उत्पादन असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आणि चंदगड तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्‍यांसाठी पंचवार्षिक काजू फळपिक विकास योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी १ हजार ३२५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. योजनेच्या समितीने केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी २०० कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे.
कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आणि चंदगड तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू फळपीक विकास योजनेला मान्यता दिली आहे. ही योजना पाच वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत काजू लागवडीसाठी काजुची कलमे तपलब्ध करण्यासाठी रोपवाटिकांचो सुविधा निर्माण करणे, प्रत्येक तालुक्यात काजूची नर्सरी उपलब्ध करणे, काजूची उत्पादकता वाढविणे, काजू बोंडांवरील प्रक्रियेस चालना देणे, काजू उत्पादक शेतकरी आणि काजू प्रकल्पधारकाला अर्थसाहाय्य देणे, लागवडीपासून प्रक्रिया व मार्केटिंगविषयक मार्गदर्शन करणे आणि त्यातून रोजगार निर्मिती करणे आदी विकास उपक्रम यामध्ये राबविण्यात येणार आहे. योजना संपूर्ण कोकण विभागा अंतर्गत येणाऱ्‍या पाच जिल्ह्यांबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादन तालुके असलेल्या चंदगड, आजरा तालुक्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेत रोपवाटिका, सिंचनासाठी शेततळ्यांची उपलब्धता, विहीर आणि प्रत्येक तालुक्यात पाच हजार मेट्रीक टन क्षमतेचे गोदाम उभारणीसाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे.

-
कोट

ही योजना काजू उत्पादकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. काजू लागवड मोठ्याप्रमाणात झाल्याने आपूसकच शेतकऱ्‍यांना लाभ होईल. यामध्ये प्रक्रीयेलाही चालना देण्यात आली आहे. रोपवाटीका यांनाही अनुदान दिले आहे. अंमलबजावणीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याने योजनेचा लाभ त्वरी घेता येईल.

- विवेक बारगिर, माजी अध्यक्ष