सरकारी योजनांबाबत वेरळ गावात जनजागृती

सरकारी योजनांबाबत वेरळ गावात जनजागृती

rat२७१८.TXT

बातमी क्र. १८ (टुडे ३ साठी)
फोटो ओळी

- rat२७p१२.jpg-
८५५४४
लांजा ः वेरळ गावात शेती संबंधित जनजागृती करणारे कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रातील विद्यार्थी.

सरकारी योजनांबाबत वेरळ गावात जनजागृती

कृषी महाविद्यालयीन विद्यार्थी ः शेतकऱ्यांसाठी उपक्रम

लांजा, ता. २७ : सरकारी योजना व कर्ज योजना याची माहीती गावातील शेतकऱ्यांपर्यंत अवधानाने पोहचत नाही. त्यामुळे या योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही. प्रतिसाद वाढावा यासाठी विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील कृषक सोबती या विद्यार्थी गटाने वेरळ गावात शेती संबंधित विविध प्रकारचे कर्ज व योजनांबाबत जनजागृती केली.
वेरळ येथे त्या विद्यार्थ्यांनी शेक-यांना अर्जासाठी लागणारे कागदपत्र, अवघड अटी, आवश्यक बाबी सहज, सोप्या भाषेत सांगितल्या. शेतकरी व महिला बचत गटाच्या महिलांना या योजनांबाबत अनेक प्रश्न आणि समस्या होत्या, त्यावरही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय योग्य मार्गदर्शन करून ते प्रश्न सोडवले. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. ब-याच वेळा अनेक सरकारी योजना व कर्ज योजना गावातील शेकऱ्यांपर्यंत अनवधानाने पोहचत नाहीत. कृषी विद्यार्थी शेक-यांपर्यंत पोहचून या योजना समजवत आहेत, हे कौतुकास्पद आहे असे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. ही माहिती कु. विनय भेरे, कु. अनिकेत नालगोंडा, कु. शुभम पारकर, कु. तलहा अराई, कु. आदित्य देशमुख, कु. अनिरुद्ध रेडिज व कु. प्रथमेश जाधव यांनी शेतकऱ्यांना दिली. या कार्यक्रमाला वेरळ सरपंच सुवर्णा जाधव, विविध महिला बचत गट अध्यक्ष उपस्थित होते. सर्व प्रात्यक्षिक कृषी महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जी. नाईक, कार्यक्रम समन्वयक डॉ. आनंद हणमंते, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत जाधव, डॉ. शिवाजी भोसले यांचे देखील मार्गदर्शन लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com