साखरपा पंचक्रोशीतील बेरोजगारी कमी करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखरपा पंचक्रोशीतील बेरोजगारी कमी करणार
साखरपा पंचक्रोशीतील बेरोजगारी कमी करणार

साखरपा पंचक्रोशीतील बेरोजगारी कमी करणार

sakal_logo
By

rat२७२२.txt

बातमी क्र. २२ (टुडे पान ३ साठी)

फोटो ओळी
- rat२७p११.jpg-
८५५४३
संजय सुर्वे
--
साखरपातील बेरोजगारी कमी करणार

संजय सुर्वे ः लवकरच रोजगार मेळावा घेणार

साखरपा, ता. २७ : साखरपा पंचक्रोशीतील बेरोजगारी कमी करून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी पुढील आठवड्यात वाडी-वाडीवर जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला जाणार आहे. बेरोजगारांना काम मिळावे, यासाठी सर्वाधिक प्रयत्न करणार असल्याचे शिवसेनेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
साखरपा कोंडगाव मच्छीमार्केट येथील झालेली संडास व शौचालयाची अवस्था अतिशय खराब झाली असून ती ग्रामपंचायतीने परवानगी दिली तर स्वखर्चाने सुंदर बनविण्याची इच्छा सुर्वे यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज दिला आहे. एवढ्यावर न थांबता साखरपा येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा लवकरच भरविणार असल्याचे सांगितले पावसाळ्यात नेहमीच जगदीश राईन यांच्या घराला पाण्यापासून धोका असून त्यांच्या घराशेजारी असणाऱ्या ओढ्याला संरक्षण भिंत कोंडगाव बाईंगवडीतील शशिकांत सावंत यांच्या घराशेजारी असणाऱ्या ओढ्याला संरक्षक बांधण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन हा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.