
अंगणवाडी भरतीचा मार्ग मोकळा
71399
27779
अंगणवाडीतील भरतीचा मार्ग मोकळा
रिक्त पदे भरणार; दीर्घकाळ रखडलेल्या प्रक्रियेला गती
रुपेश हिराप ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः शासनस्तरावरून रखडलेली अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका रिक्त पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ४३ अंगणवाडी सेविका, २१७ मदतनीस तर १५ मिनी अंगणवाडी सेविकांची पदे यात भरली जाणार असून प्रत्येक तालुकानिहाय इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातुन देशभरात अंगणवाड्याचे जाळे पसरविण्यात आले आहे. या अंगणवाड्यांमधून बाल्यवस्थेतील मुलांना आरोग्य, आहार, शिक्षण सुविधा पुरविण्याचे काम त्याठिकाणी शासनाच्या माध्यमातून अंगणवाडीसेविका तसेच मदतनीस करत आहेत. त्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात; मात्र अलिकडे राज्यात मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका पदे रिक्त होती. २०१७ पासून रिक्तपदांबाबत भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोनाच्या आधी पन्नास टक्के रिक्त पदे भरण्याच्या हालचाली झाल्या होत्या; मात्र प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर कोरोना काळात ही भरती झाली नव्हती. नंतर ही प्रक्रिया पुर्ण करण्यात आली; मात्र आता उर्वरित सर्व रिक्तपदे भरण्याबाबत शासनाकडून आदेश काढण्यात आले असून तशा प्रकारची प्रक्रियाही सुरू झाली आहे. यासाठी प्रत्येक तालुकानिहाय अर्ज मागविण्यात येत आहेत.
----
निर्णयामध्ये काही बदल
अंगणवाडी सेविका मदतनीस या पदांसाठी शासनाने नव्याने काढलेल्या निर्णयामध्ये काही बदल केले आहेत. पूर्वी असलेल्या काही अटी, शर्ती बदलून त्यात सुधारणा केली आहे. आता राज्य शिक्षण मंडळ अंतर्गत बारावी उत्तीर्ण व त्यास समकक्ष अशी शैक्षणिक पात्रता निश्चित केली असून वयाची अट वाढवून ३५ केली आहे. विधवांसाठी वयाची अट ४० केली आहे. इच्छुक महिला त्या गावची स्थानिक रहिवाशी व महसुली गावातील असणे आवश्यक आहे. शैक्षणिक गुणांनुसार ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
---
...तर विधवा दाखला हवा!
भरती प्रक्रियेत एकच अर्ज आल्यास त्याठिकाणी पुन्हा जाहिरातीचे अर्ज मागविण्यात येणार आहे. तरीसुद्धा एकच अर्ज आल्यास पुन्हा अर्ज मागविण्यात येणार आहेत. यावेळीही एकच अर्ज आल्यास त्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पडताळून कायम केला जाणार आहे. एखाद्या विधवेचा अर्ज आल्यास त्यासाठी दहा गुण अतिरिक्त आहेत; मात्र संबधित महिलेकडे विधवा दाखला जोडणे आवश्यक आहे.
------------
कोट
अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका ही भरती शैक्षणिक गुणांनुसार होणार आहे. बारावी आणि त्यापुढील शिक्षणावर हे गुण आधारीत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात त्या-त्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात भरतीचे फार्म उपलब्ध करुन देण्यात आले असून इच्छुकांनी आवश्यक कागदपत्र जोडून फॉर्म भरावेत.
- संतोष भोसले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला बालकल्याण
------------
तख्ता
अंगणवाडी मदतनीस
तालुका*मंजूर पदे*रिक्त पदे
सावंतवाडी*२०७*२८
कणकवली*१९६*३७
मालवण*२००*५७
वेगुर्ले*१०७*१८
कुडाळ*२०६*३०
वैभववाडी*७७*५
देवगड*१६९*५७
दोडामार्ग*८०*६
एकूण*१२४२*१०२५
----------
मिनी अंगणवाडी सेविका
तालुका*मंजूर पदे*रिक्त पदे
सावंतवाडी*४१*३
कणकवली*५४*३
मालवण*३२*३
वेंगुर्ला*४३*०
कुडाळ*७६*५
वैभववाडी*२३*०
देवगड*५७*१
दोडामार्ग*२६*०
--
ग्राफ
अंगणवाडी सेविका पदांची स्थिती
तालुका*मंजूर पदे*रिक्त पदे
सावंतवाडी*२०७*९
कणकवली*१९६*४
मालवण*२००*९
वेंगुर्ले*१०७*१
कुडाळ*२०६*७
वैभववाडी*७७*५
देवगड*१६९*६
दोडामार्ग*८०*२