चाळीस वर्षांवरील क्रिकेटमध्ये खांबाळे-आर्चिणे संघ विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाळीस वर्षांवरील क्रिकेटमध्ये 
खांबाळे-आर्चिणे संघ विजेता
चाळीस वर्षांवरील क्रिकेटमध्ये खांबाळे-आर्चिणे संघ विजेता

चाळीस वर्षांवरील क्रिकेटमध्ये खांबाळे-आर्चिणे संघ विजेता

sakal_logo
By

85580
वैभववाडी ः विजेत्या खांबाळे-आर्चिणे संघाला मान्यवरांच्या हस्ते चषक देण्यात आला. यावेळी सूरज पाटील, जयेंद्र रावराणे, संजय सावंत, विजय रावराणे आदी.

चाळीस वर्षांवरील क्रिकेटमध्ये
खांबाळे-आर्चिणे संघ विजेता
वैभववाडी ः विजय रावराणे मित्रमंडळाच्यावतीने आयोजित चाळीस वर्षांवरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत खांबाळे-आर्चिणे संघ विजेता, तर रामेश्वर-करुळ संघ उपविजेता ठरला. तृतीय क्रमांक भगवती-सांगुळवाडी संघाने पटकावला.
विजय रावराणे मित्रमंडळाच्या वतीने चाळीस वर्षांवरील खेळाडूंसाठी क्रिेकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील अंतिम सामना खांबाळे-आर्चिणे संघ आणि रामेश्वर करुळ या दोन तुल्यबळ संघांत झाला. प्रथम फलदांजी करताना खांबाळे-आर्चिणे संघाने ५ षटकांत बिनबाद ५९ धावा केल्या. यामध्ये एकनाथ पवार यांच्या ३८ आणि नरेंद्र गुरव यांच्या २१ धावांचा समावेश होता. ६० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला रामेश्वर करुळ संघ अवघ्या तीस धावा करू शकला. खांबाळे-आर्चिणे संघाच्या बयाजी बुराण, उत्तम सुतार, सुहास लोके आणि नरेंद्र गुरव यांनी अचूक टप्प्यावर गोलदांजी केली. एकनाथ पवार यांना सामनावीर पारितोषिक देण्यात आले. बक्षीस वितरण पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील, उपनगराध्यक्ष संजय सावंत, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, मंगेश लोके, विजय रावराणे, दीपक कदम, विश्राम राणे यांच्या हस्ते झाले. विजेत्या खांबाळे-आर्चिणे संघाला ११ हजार १११ रुपये व चषक, उपविजेत्या रामेश्वर करुळ संघाला ७ हजार ७७७ व चषक, तर तृतीय भगवती संघाला ३ हजार रुपये व चषक देण्यात आला. स्पर्धेसाठी स्वप्नील नागवेकर, नंदू राणे, गुरुनाथ गुरव, गोविंद रावराणे, रामा पाटील यांनी परिश्रम घेतले.
---
पिसेकामते-आमवणे जोडपुलाची मागणी
कणकवली ः गडनदीवर गोठणे ते किर्लोस येथे असलेल्या ब्रिजकम बंधाऱ्याच्या बाजूलाच पुलाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे ८ कोटी २८ लाख मंजूर झाले आहेत; परंतु हा पूल ब्रिजकम बंधाऱ्याच्या बाजूला न बांधता तो पिसेकामते-आमवणे या दोन गावांना जोडणारा पूल गडनदीवर बांधावा, अशी मागणी आमवणे येथील दिलीप लाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आमवणे व पिसेकामते या दोन गावांच्यामधून गडनदी बारमाही वाहते. त्यामुळे नदीपात्रातून प्रवास करणे कठीण असते. याशिवाय शहराकडे जाण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे आमवणे ते पिसेकामते गाव जोडणारा हा पूल झाल्यास कोरमळे, असरोंडी, सातरल, कासरल, किर्लोसमार्गे मालवण असे गाव जोडले जाऊन विकासास चालना मिळणार असल्याचे लाड यांनी म्हटले आहे.
----------------
‘मॅग्मो’ संघटनेची एप्रिलमध्ये निवडणूक
सावंतवाडी ः महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी वैद्यकीय संघटनेच्या (मॅग्मो) राज्य अध्यक्षपद, सचिव आणि कोषाध्यक्षपदाची निवडणूक ७ ते ९ एप्रिल दरम्यान होत आहे. निवडणुकीत अध्यक्षपदासाठी रत्नागिरी मॅग्मोचे सध्या अध्यक्ष असलेले डॉ. बी. एन. पितळे रिंगणात असून त्यांनी नुकताच सिंधुदुर्गचा दौरा केला. डॉ. पितळे आणि यवतमाळ येथील डॉ. विजय आकोलकर यांच्यात अध्यक्षपदासाठी लढत होत आहे. पेन्शनसह विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी डॉ. पितळे यांनी दिली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना सक्षम बनवून त्यांच्यात सचोटी आणि शिस्त यांचा अंगिकार करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
---
रोणापालला उद्या धार्मिक कार्यक्रम
बांदा ः श्री देवी माऊली पंचायतन वर्धापन दिनानिमित्त श्री देवी माऊली मंदिर रोणापाल येथे बुधवारी (१ मार्च) सकाळी दहाला सत्यनारायण महापूजा, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री आठला श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ रोणापाल यांच्यावतीने श्री दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ले यांचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.